पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केल्यास जनतेला न्याय मिळतो- मा.आ.चंद्रशेखर कदम

0

डॉ.जाकीर शेख यांची बदली झाल्याने निरोप समारंभ

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी

            राजकीय पदाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना नसता रुबाब न दाखवता त्यांना विश्वासात घेऊन एकमेकांच्या हातात हात घेऊन काम केले तर त्याचा लाभ सर्व सामान्य जनतेला होऊन त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळतो हा माझा आमदार काळातील अनुभव असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर कदम पाटील यांनी केले आहे. देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सहा वर्षाहून अधिक काळ सेवा देऊन नियमानुसार बदली झालेले डॉ.जाकीर शेख यांना निरोप देतांना कदम बोलत होते. 

        माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांचे हस्ते डॉ.शेख यांना शाल,श्रीफळ देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम,बगाईत पिक सोसायटीचे संचालक मछिंद्र कदम,पत्रकार गणेश अंबिलवादे, भाऊसाहेब वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सत्यजीत कदम यांनी आगामी काळात देवळाली प्रवरा येथे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यासाठी प्राधान्य देणार असून त्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री यांची नुकतीच भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

   

डॉ.शेख यांचे कार्यकाळात शहरातील जेष्ठ नागरिक, रुग्ण,दिव्यांग बांधव,व सर्व सामान्य माणसाला आपुलकीची वागणूक मिळाली तर शहरातील स्वच्छता व आरोग्य आबादित ठेवण्यासाठी डॉ.शेख यांचे योगदान मिळाले असल्याचे भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

    नोकरी करतांना ठिकठिकाणी गोड व कडू असे दोन्ही अनुभव येत असतात मात्र देवळाली प्रवरा येथे सहा वर्ष काम करताना मात्र नेहमी गोड व सुखद क्षण वाट्याल्या आल्याची भावना डॉ.जाकीर यांनी व्यक्त करत या ठिकाणी काम करताना सहकार्य केल्याबद्दल चंद्रशेखर कदम,सत्यजित कदम,आरोग्य केंद्रातील अधिकारी,कर्मचारी,शहरातील पत्रकार, कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here