काकडी गावाचे कराचे पैसे थकवून आमदार काळेंच्या विकासाच्या खोट्या गप्पा – पूर्वा गुंजाळ 

0

कोपरगाव : काकडी येथे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. केंद्र सरकार असे विविध उपक्रम जनतेसाठी राबवते त्याचे स्वागत आहे. मात्र स्थानिक यंत्रणेने या कार्यक्रमात काकडी गावच्या प्रथम नागरिक सरपंच पूर्वा गुंजाळ यांना डावलण्यात आले व ज्यांचा काकडीच्या विकासाशी कवडीचा संबंध नाही अशा आमदार आणि पालकमंत्र्यांनी श्रेयवादासाठी फक्त मिरवण्याचे काम केले आहे. ग्रामपंचायतचे विमानतळ प्राधिकरणाकडे थकलेले कराचे आठ कोटी तीस लाख हक्काचे असताना दिले जात नाही. त्यांनी शेकडो कोटींच्या हवेतल्या गप्पा करू नये असा टोला पूर्वा गुंजाळ यांनी आमदार काळे यांना लगावला आहे.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक अधिकारानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना अमूल्य असे अधिकार दिलेले आहेत. ग्रामपंचायत च्या सरपंच या महिला असताना त्यांना शासकीय कार्यक्रमासाठी साधे निमंत्रण देखील नाही. तालुक्यात कुठलेही विकासाचे काम न करता केवळ काकडी गावच्या त्यागावरती उभे राहिलेल्या विमानतळासाठी हक्काच्या येणाऱ्या पैशांना स्वतःचे नाव चिकटवण्यात आमदार काळे व्यस्त आहेत. आपली निष्क्रियता उघड पडते की काय त्यामुळे ज्यांनी जमिनी दिल्या त्या गावचे प्रश्न वाऱ्यावर सोडून स्वार्थ साधण्याचे काम आमदार करता आहेत.

ज्यांनी विमानतळासाठी आपल्या जमिनी दिल्या त्यांच्या घराकडे जाण्यासाठी नीट रस्ता नाही. गावामध्ये विकास कामे करण्यासाठी कररुपि थकीत असणारा पैसा विमानतळ प्राधिकरणाने ग्रामपंचायतला देणे आवश्यक आहे. दुर्दैवाने आमदार आशूतोष काळे यांना सामान्य जनतेचे समस्यांचे काहीही पडलेले नसून हवेतून उडणाऱ्या उच्चभू लोकांच्या सुविधांचे श्रेय घेऊन स्थानिक विकासावर वरवंटा फिरवण्याचे पाप करण्यात त्यांना रस आहे. आपला कुठलाही कवडीचा संबंध नसताना शासकीय कार्यक्रमात फक्त प्रोटोकॉल म्हणून मिळवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या तालुक्यातील हे गाव आहे व ज्या कार्यक्रमासाठी आपण आलो आहोत तेथील गावच्या प्रमुख पदाचा अनादर आपण त्यांचे हक्क डावलून करतो आहोत का? याचाही विचार त्यांनी करणे गरजेचे होते.

तालुक्यात साडेतीन-चार हजार कोटींच्या वल्गना सुरू आहेत. प्रत्यक्षात सामान्य जनता रोजगार पाणी, वीज रस्ते दैनंदिन आयुष्यातील विविध प्रश्नांची झगडते आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी आमदार काळे यांना जनतेला खोटे बोलून फसवण्यात रस आहे अशी टीका गुंजाळ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here