बुध्द तत्वज्ञानाचं विचारधन : भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो

0

भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो याचा धम्म चळवळीतील योगदान काळच्या कसोटीला उतरले आहे. धम्माचे गाढे अभ्यासक विशुध्द आचारवंत प्रज्ञा शील करुणा चे मूर्तिमंत प्रतीक म्हणून त्यांच्याकडे आदराने बघितल्या जाते. त्यांच्या जीवनाचा आतापर्यंत प्रवास प्रेरणादायी, स्फूर्तीदायक व दिशादर्शक आहे. 5 जानेवारी 1975 या दिवशी भंते ऊपाली यांनी कठोर शिस्तीचे अंधश्रध्दा, रुढी परंपरा यावर तुटुन पडणारे धम्म साध्या पध्दतीने समजावुन सांगणारे व अंतकरणामध्ये कमालीचे करुणा असणारे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सरकार खाली भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या विचारांची जडण घडण झाली. भदंत ऊपाली विविध ठिकाणी प्रवचनासाठी जात असत.  सोबत भदंत उपगुप्त त्यांना घेवून जात असत.  डिसेंबर 1975 नागपूर  या ठिकाणी बुध्द धम्माचे फार मोठे अधिवेशन भरले होते. बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रिपब्लीकन नेते बी.सी. कांबळे, जागतिक किर्तीचे विद्वान भंते भदंत डॉ. आनंद कौशल्यायन यांची अधिवेशनाला प्रमुख उपस्थिती होती. या ऐतीहासिक अधिवेशनाला भदंत उपाली थेरो भदंत उपगुप्त यांना घेवून गेले होते. भदंत आनंद कौशल्यायन यांच्या धम्मदेशनाचा दूरगामी परिणाम त्यांच्या मनावर झाला. भैय्यासाहेब आंबेडकर व इतर मान्यवरांचे विचार ऐकुन ते प्रभावित झाले. नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी भदंत डॉ. आनंद कौशल्यायन यांची प्रवचने ज्या ठिकाणी होत त्या ठिकाणी भदंत उपगुप्त जात असत. यामधुन त्यांचा जवळुन  परिचय झाला. 21 जानेवारी 1981 हा दिवस भते उपगुप्त त्‍यांच्या जिवनामध्ये सुवर्ण अक्षरांमध्ये लिहून ठेवण्यासारखा भदंत डॉ. आनंद कौशल्यायन यांच्या हस्ते त्यांच्या प्रबज्या विधी पार पाडला. हे ठिकाण उत्तरप्रदेशातील बुध्द धम्माचे पवित्र स्थळ कुशीनगर होय.

बोधीसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी धम्मदीक्षा दिली असे भदंत चंद्रमणी महास्थविर त्यांच्या वात्व्याने पावन झालेली ही भूमी या रोमहर्षक प्रसंगी भंते उपगुप्त यांचे पूर्वाश्रमीचे आई-वडील त्याचप्रमाणे पूर्णा शहरामध्ये धम्मसेवेला वाहून घेतलेले भास्कर भराडेबाई, टिकाबाई खरे, अंजनाबाई कांबळे, सुरवयी पालकर व इतर श्रध्दा संपन्न उपासक आणि उपासिका उपस्थित होते. प्रबोधन दृष्टिचे पुज्य भदंत ऊपाली व धम्माचे अभ्यासक महान साहित्यिक विशुध्द आचार व विचार ज्यात संपूर्ण जीवन बोधीसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला समर्पित होत असे. भदंत डॉ. आनंद कौशल्यायन यांच्या विचाराचा प्रभाव भंते उपगुप्त यांच्या मध्ये प्रतिबिंबित झाला. त्यांनी तेव्हाच स्पष्ट केले होते, की येणाऱ्या काळात माझा शिष्य उपगुप्त हे जागतिकींचे बौध्द भिक्खु होतील ते आज आपणाला खरे होतांना दिसत आहे. डॉ उपगुप्त महाथेरो खऱ्या अर्थाने धम्माचे चालते-बोलते विद्यापीठ आहे. त्यांनी बुध्दविहारामध्ये स्वत:ला बंदिस्त करुन ठेवले नाही. यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बावरीनगर नांदेड, सात्कर्मी लातूर, धम्माचल अजिंठा, बीड, हिंगोली, देवगांव फाटा परभणी व इतर अनेक ठिकाणी भव्य-दिव्य बुध्दविहार व संस्कार केंद्र उभारली आहेत. पूर्णा शहरात बौध्दकालीन वास्तुशिल्प कलेचा विलोभनिय नमुना असलेलं बुध्द विहार निसर्गरम्य उद्यान, सुसज्ज ग्रंथालय व वाचनालय स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका तीन मजली पर्यटक निवास प्रशस्त जागे मध्ये उभे आहे. 

महाराष्ट्र शासनाने या विहारास पर्यटन स्थळाचा व तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. वर्षभर बुध्दविहारामध्ये धम्माच्या प्रबोधनाचे कार्यक्रम रविवारी साप्ताहिक वंदन पोर्णीमेला धम्मदेसना, वर्षावास कालखंडामध्ये धम्म ग्रंथाचे वाचन मान्यवर व व्याख्यान थोर महापुरुष व समाजसुधारक यांची जयंती दिन व स्मृतीदिन साजरे केले जातात. दरवर्षी नित्य नियमाने देश- विदेशात त्यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म सहलीचे आयोजन केले जाते. भदंत डॉ. महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली व सरकारातून उच्चशिक्षित चारित्रय संपन्न भिक्खूची मोठी परंपरा तयार झाली आहे. भंते जिनरत्न, भंते प्रज्ञापल, भंते बोधीशिल, भंते बोधीधम्म, भंते पंय्यावांश, भंते पंय्याबोधी हे सर्व बौध्द भिक्खु बुध्दविहार पुर्णा येथुन घडले. धम्माचे अद्यावत ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी त्यांनी काही भंतेना श्रीलंका या ठिकाणी पाठविण्यात आले. धम्माच्या प्रचार व प्रसार कार्यात त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. धम्म कार्य करणाऱ्‍या संघटनामध्ये सुसूत्रता असावी. त्यांच्या मध्ये योग्य तो समन्वय असावा. विशुध्द रुपा मध्ये धम्म समाजामध्ये रुजावा. यासाठी व भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर यांच्या सोबत मंगलमैत्रीची भूमीका घेवून अखिल भारतीय भिक्खु संघ व भारतीय बौध्द महासभा यांनी एकत्र येवून धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प केला आहे. लातूर, परभणी, बीड व इतर ठिकाणी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो व भारतीय बौध्द महासभेचे  कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मपरिषद संपन्न झाल्या.

निश्चितच त्यांच्या प्रयत्नातून बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला प्रबुध्द भारत निर्माण होणार आहे. जगामध्ये विविध बौध्द राष्ट्र आहेत. श्रीलंका, म्यानमार, कंबोडिया, भूटान, चीन, थायलंड, जापान, दक्षिण कोरिया येथील उपासक-उपासिका यांनी विशुध्द स्वरुपामध्ये बौध्द धम्म जतन करुन ठेवला आहे. शिल सदाचार नैतीक मार्गाने बुध्‍द तत्वज्ञानाचा स्वीकार करुन एक आदर्श बौध्द राष्ट्र म्हणुन नावलौकिकास पात्र आहेत. अशा राष्ट्रांच्या धम्म सहलीचे आयोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असते. भारतीय प्रशासन सेवेतील उच्चपदस्थ सेवानिवृत्त अधिकारी यांचे शिष्टमंडळ भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण कोरिया या बौध्द राष्ट्राला भेट देवून आले. दक्षिण कोरियाच्या मदतीने अजंठा धम्माचल या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाली भाषेचे विद्यापीठ, धम्माचे संशोधन केंद्र उभे करण्याचा त्यांचा मानस आहे. या ठिकाणी 74 एकर जमीन खरेदी केलेली आहे. दरवर्षी या ठिकाणी धम्म परिषदेचे आयोजन केल्या जाते. दक्षिण कोरिया येथील भंतेगण, विद्यापीठाचे कुलगुरु व तेथील उद्योगपती यांनी उपस्थिती या धम्मपरिषदेला होती. जागतिक दर्जाचे पाली विद्यापीठ व धम्माचे संशोधन केंद्र सुरु करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास त्यांनी आश्वासित केले आहे.

लोक भाऊंच्या कालखंडामध्ये पूर्णा शहरामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठया प्रमाणावर गरीब व गरजु लोकांना अन्नधान्याचे व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप फिजीकल डिसटन्स चे अंतर ठेऊन करण्यात आले. या कालखंडामध्ये घरपोच ग्रंथ व पुस्तक वाचण्याचे सुविध उपलब्ध करुन दिली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचा वर्षावास सुरु आहे. हाती घेतलेले प्रत्येक रचनात्मक काम धम्मकार्य साततयाने ते पार पाडत असतात. 5 मार्च 2022 हा त्यांचा श्रामणेर पप्जजा विधीचा 47 वा वर्धापन दिन महाराष्ट्राच्याच देशााच्या विविध भागातून शुभेच्छाांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे. या मंगलप्रसंगी त्यांना आयु, आरोग्य व बळ प्राप्त होवो. त्यांनी हाती घेतलेले धम्म कार्य सदोदितपणे चालू राहो ही मनोकामना.

प्रविण बागडे

नागपूर  14  भ्रमणध्वनी : 9923620919 ई-मेल : pravinbagde@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here