दिनविशेष/राशिभविष्य/पंचांग

0

आजचा दिवस  शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, अश्विन शुक्ल नवमी सकाळी १० वा. ५९ मि. पर्यंत नंतर दशमी, नवरात्र पारणे, महानवमी, विजयादशमी, शनिवार, दि. १२ ऑक्टोबर २०२४, चंद्र – मकर राशीत, नक्षत्र – श्रवण, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ३३ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. १७ मि. 

नमस्कार आज चंद्र  मकर राशीत रहाणार आहे. आजचा दिवस शुभ दिवस आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, कर्क, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर व मीन या राशींना अनुकूल तर मिथुन, सिंह व कुंभ या राशींना प्रतिकूल असणार आहे. 

                                                                                        दैनंदिन राशिभविष्य

मेष – मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी राहणार आहात. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. उत्साहाने कार्यरत रहाल. प्रवास सुखकर होतील. 

वृषभ – मानसिक प्रसन्नता लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. एखाद्या तीर्थक्षेत्री भेट द्याल. जिद्दीने व आत्मविश्वासपूर्वक कार्यरत रहाल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

मिथुन – दैनंदिन कामात अडचणी जनावतील. मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने जपून चालवावित. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. स्वास्थ्य कमी राहील. 

कर्क – मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आनंदाने कार्यरत रहाल. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. 

सिंह – तुमच्या दैनंदिन कामात तुम्हाला अडचणी जाणवणार आहेत. प्रवास शक्यतो टाळावेत. मनोबल कमी असल्याने आज आपल्याला कोणत्याही कामात उत्साह वाटणार नाही. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या – प्रियजनांसाठी वेळ देऊ शकाल. मनोबल उत्तम राहील. काहींना विविध लाभ होतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. बौद्धिक क्षेत्रात अनुकूलता लाभेल. आनंदी राहणार आहात. 

तुला – मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आशावादीपणे कार्यरत रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अपेक्षित प्रगती होणार आहे. प्रवास सुखकर होतील. 

वृश्चिक – मनोबल वाढणार आहे. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत रहाल. जिद्द वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. उत्साह वाढेल. 

धनु – कौटुंबिक सौख्य लाभेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक कामासाठी आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. 

मकर – तुमचा उत्साह व उमेद आज विशेष असणार आहे. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. मनोबल उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील. आनंदी रहाल. 

कुंभ – मनोबल कमी असणार आहे. काहींना आज अनावश्यक ताण तणाव जाणवेल. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. आत्मविश्वास कमी राहील. प्रवास आज नकोत. 

मीन – मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. आनंदी व आशावादी रहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साहाने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवाल. 

आज शनिवार, आज सकाळी ९ ते १०.३०  वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here