केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मंगळवारी राहुरी येथे भव्य नागरी सत्कार!

0

पालकमंत्री राधाकृष्ण विखे, शिवाजी कर्डीले यांची उपस्थित राहणार

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी 

         आरपीआयचे सर्वेसर्वा,केंद्रीय मंत्री खासदार रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्री झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हयातील समस्त कार्यकर्ते यांचे वतीने भव्य नागरी सत्कार आयोजीत करण्यात आल्याची माहिती आरपीआय चे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात व आरपीआय च्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली. मंगळवार दि १५ रोजी सायंकाळी ५ वाजता राहुरी येथील स्नेहपूज मंगल कार्यालयात होणाऱ्या या नागरी सत्कारासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटिल,माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले,आरपीआयचे जेष्ठ नेते श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्यांचा समस्त नगर जिल्ह्यातील कार्यक्त्यांचे वतीने पाहिला सार्वजनिक नागरी सत्कार होत आहे.या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे अवाहन आर पी आय चे तालुकाप्रमुख विलास नाना साळवे, गोविंदराव दिवे,शिरीषराव गायकवाड,सागर साळवे, पोपट दिवे,सचिन सगळगिळे,अतुल ञिभुवन,नवीन साळवे,प्रविण लोखंडेया नागरी सत्कारच्या निमित्ताने श्रीरामपूरची जागा आरपीआयला च मिळावी ही जोरदार मागणी मंत्री आठवले व पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटील यांचे कडे केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा नागरी सत्कार हा आगामी विधानसभा निवडणूक निमित्त नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघातील परिस्थिची आढावा बैठक असल्याचे बोलले जात आहे. त्या अनुसघांने या बैठकीत चर्चा होणार आहे. त्याच बरोबर  आर पी आय(आठवले गट) हा महायुती मधील एक घटक पक्ष आहे.येणाऱ्या विधानसभा निवडणूकामधे आर पी आय ला बारा जागा मिळाव्यात अशी मागणी मंत्री आठवले यांनी महायुती च्या नेत्याकडे केली आहे. या बारा जागा पैकी गेल्या तीन पंचवर्षीक व आता आणखी दोन पंचवार्षिक निवडणुकीसाठी राखीव असलेल्या श्रीरामपूर विधानसभेची जागा आरपीआय ला मिळवी करण गेली तीन पंच वार्षिक निवडणुकामध्ये मागणी करून ही सदर जागा आरपीआय ला सोडण्यात आली नाही.आम्ही नुसत्या सतरंज्या उचलण्याचे काम करायचे का?आता मात्र ही जागा आरपी आय ला द्या अन्यथा आम्ही महायुति चे काम करणार नसल्याचा इशारा नगर जिल्ह्यातील दलित समाजाच्या सर्व नेत्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here