ढोरकीन – कापुसवाडी बालानगर, खादगांव लिंबगांव ते रामा ६१ रस्ता रस्त्याचे आॅनलाईन भूमिपूजन

0

पैठण.(प्रतिनिधी): आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग ५७२ ई ते ढोरकीन – कापुसवाडी बालानगर खादगांव लिंबगांव ते रामा ६१ रस्ता प्रजिमा ३६ किमी ०/०० ते २६/८७० (भाग ढोरकीन ते लिंबगांव फाटा) मधील सुधारणा करणे, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर या कामाचे आॅनलाईन भूमिपूजन सोहळा शुक्रवार दिं.११. रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला.

   

यावेळी आॅनलाईन पध्दतीने कामाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित पवार, रविंद्र चव्हाण मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), महाराष्ट्र राज्य,छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार ,छत्रपती संभाजीनगरचे खासदार  संदिपान भुमरे,जालण्याचे खासदार कल्याण काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजु नाना भुमरे पाटील,एस एस भगत अधीक्षक अभियंता, सा. बां. मंडळ, छत्रपती संभाजीनगर, एस. आर. कातकडे मुख्य अभियंता, सा. बां. विभाग, छत्रपती संभाजीनगर, ए. डब्ल्यु. येरेकर कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, छत्रपती संभाजीनगर, सार्वजनिक बांधकाम उप विभाग क्रमांक ३ पैठणचे सहाय्यक अभियंता राजेंद्र बोरकर पाटील, सरपंच शिवराज भुमरे, बाबुराव पडूळे, काकडे, बाबासाहेब शिंदे सह आदी उपस्थित होते.

   आशिया डेव्हलपमेंट बैंक यांच्या कडून ढोरकीन,कापुसवाडी,बालानगर, हदगाव,लिंबगाव प्रजिमा ३६ , किलोमीटर २७ मीटर लांबीसाठी सिमेंट क्राॅक्रीटकरण करणे या कामासाठी २१४ कोटी रुपये मंजूर झाले तर पैठण आपेगाव,शहागड राज्य महामार्ग २६ वर २७ किलोमीटर लांबी व पाचोड गावात चौपदरीकरण करणे या दोन्ही कामांना मिळून २५० कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे सदरील काम महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळ यांच्या मार्फत करण्यात येणार आहे.

     राजेंद्र बोरकर पाटील– सार्वजनिक बांधकाम उप विभाग क्रमांक ३ पैठणचे सहाय्यक अभियंता श्रेणी.१. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here