सातारा : सर्व क्षेत्रात सर्वोच्च कार्य करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत.याशिवाय, पत्रकार क्षेत्रातही प्रबुद्ध भारत, समता,बहिष्कृत भारत,जनता व मूकनायक याद्वारे बहुजनांना त्यांनी न्याय दिला.असे प्रतिपादन ज्येष्ट साहित्यिक विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे यांनी केले.
डॉ.आ.ह.साळुंखे (तात्या) यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनपर बंधुत्व पुरस्कार भारत मासिकचे संपादक आबा मुळीक यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
सन्मानपत्राचे वाचनही करण्यात आले.गत वर्षीही बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार संस्थापक अनिल वीर यांनी तात्यांना प्रदान केला होता.अर्थात,सलग दोन वर्षे बंधुत्व प्रतिष्ठानचे दोन पुरस्कार मिळविणारे तात्या होत.
ऋषीकेश पाटील यांनी स्वागत केले.यावेळी तात्याबरोबर अनेक विषयांवर चर्चा-विनिमय करण्यात आला.त्यांची ग्रंथ संपदा खोल्या-खोल्यामध्ये जाऊन पाहिली.काही पुस्तकेही घेण्यात आली.अनुप बढेकर यांनी आभार मानले.