पुणे विभागीय संघातुन तो दाखविणार खेळाचे कौशल्ये
कोपरगांव: क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने सोलापुर येथे विभागीय व्हालीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तेथे पुणे विभागा अंतर्गत सात संघ आले होते. यात संजीवनी ज्युनिअर कॉलेजचा संघ उपविजयी झाला होता. या सात संघातुन पुणे विभागाचा एक संघ तयार करण्यात आला. यात संजीवनीच्या अलीमोहम्मद फिरोज शेखची निवड झाली. यातुन त्याची संपुर्ण राज्याच्या संघासाठी निवड चाचणीसाठी निवड झाली आहे.
तेथे त्याची निवड झाली तर शेख हा राज्याच्या व्हॉलीबॉल संघातील खेळाडू असेल, अशी माहिती संजीवनी ज्यु. कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की सोलापुर येथे झालेल्या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये संजीवनीच्या संघाने अहिल्यानगर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तेथे अलिमोहम्मदने उतकृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे त्याची पुणे विभागाच्या संघात निवड झाली आहे. आता तो पुणे विभागाच्या संघातून आपले खेळाचे कौशल्ये धाराशिव येथे दाखविणार आहे.
तेथे राज्यातुन एकुण आठ संघ येणार असुन या आठ संघातील उत्कृष्ट खेळाडूंमधुन राज्याचा संघ तयार होईल. तेथेही त्याची राज्य संघासाठी निवड होवु होईल, अशी आशा आहे. तसे झालेच तर राज्याच्या संघात संजीवनीचा खेळाडू असेल. संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी अलिमोहम्मदचे अभिनंदन करून पुढील निवडीसाठीही शुभेच्छा दिल्या आहे. तसेच प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंडगे यांचेही अभिनंदन केले आहे.