शिवसेना शिंदे गटाचा बडा नेता तुतारी हाती घेण्याच्या तयारीत;

0

अजित पवारांच्या आमदाराविरोधात थोपटले दंड

सातारा : आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे साहजिकच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यास नेते जाहीरपणे बंड करण्याचे भाष्य करीत आहेत. यंदाच्या निवडणुकीत अनेक नेते तुतारी चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाला  साताऱ्यात मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी याबाबत संकेत दिले आहेत.
‘शरद पवार यांचा सातारा जिल्हा बालेकिल्ला आहे, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट  अशीच लढत होणार आहे. आतापर्यंत खंडाळा तालुक्याला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, मी गेली वीस- बावीस वर्ष संघर्ष करतोय.

माझ्यावर कोणताही आरोप नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी मी एक सक्षम पर्याय होऊ शकतो. मी लढणार आहे, मला संधी हवी आहे. मला संधी दिली तर संधीच सोनं करेन’, असं सांगत पुरुषोत्तम जाधव यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.
पुरुषोत्तम जाधव यांनी वाई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. सध्या वाई विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे मकरंद पाटील आमदार आहेत. यामुळे जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीलाच जाण्याची शक्यता आहे. यामुळे आता पुरुषोत्तम जाधव हाती तुतारी घेण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here