आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, अश्विन कृष्ण चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, रविवार, दि. २० ऑक्टोबर २०२४, चंद्र – वृषभ राशीत, नक्षत्र – कृत्तिका स. ८ वा. ३२ मि. पर्यंत नंतर रोहिणी, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ३६ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. १० मि.
नमस्कार आज चंद्र वृषभ राशीत रहाणार आहे. आजचा दिवस क्षयतिथी वर्ज्य दिवस आहे. आज चंद्र – शनि केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर मिथुन, तुला व धनु या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : आपली आर्थिक योजना बरोबर ठरेल. दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरळीतपणे पार पडणार आहेत. कौटुंबिक जीवनात सुसंवादाचे वातावरण राहील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल.
वृषभ : आज तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहे. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आज कमी होणार आहे. मानसिकता सकारात्मक होणार आहे.
मिथुन : मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. कामाचा ताण राहील. दैनंदिन कामात काही अनपेक्षित अडचणी आल्याने कामे रखडणार आहेत. विरोधक व हितशत्रूवर मात कराल. प्रवास शक्यतो आज नकोत.
कर्क : अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. आरोग्याचा त्रास कमी होणार आहे. संततीसौख्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकणार आहात. जुने सहकारी भेटतील.
सिंह : दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. तुमचा उत्साह विशेष राहील. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. नोकरी, व्यवसायातील कामे आज पूर्ण करू शकणार आहात. प्रवासाचे योग येतील.
कन्या : जिद्द व चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आता कमी होणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील.
तुला : मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. आज आपण स्वतःहुन कोणतीच जबाबदारी ओढवून घेऊ नये. एखादया बाबतीत आज आपणाला मनस्ताप होणार आहे. शांत व संयमी रहावे.
वृश्चिक : तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहणार आहे. कामाचा ताण कमी होणार आहे.
धनु : अनावश्यक खर्चामुळे आज तुम्ही त्रस्त होणार आहात. मानसिक उद्विग्नता राहील. तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. प्रवासात विलंब अनुभवण्यास येईल. वाहने सावकाश चालवावित.
मकर : आज तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रिय व्यक्तींना आज तुम्ही खुश करणार आहात. तुमच्या सहकाऱ्यांशी सुसंवाद साधू शकणार आहात.
कुंभ : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या कामात काहींनाअनुकूलता लाभणार आहे. तुमचे मन अत्यन्त आनंदी व आशावादी राहणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत.
मीन : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. जिद्दीने आज तुम्ही कार्यरत राहणार आहात. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास विशेष असणार आहे.
आज रविवार, आज दुपारी ४.३० ते ६ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४