श्रीरामपूर प्रतिनिधी :नुकत्याच जाहीर झालेल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीसह महायुतीने बौद्ध समाजाला उमेदवारी न दिल्याने श्रीरामपूर तालुक्यामध्ये बौद्ध समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. गेल्या वीस वर्षापासून महाविकास आघाडी व महायुतीने बौद्ध समाजाचा वापर फक्त मातापुरता केला असून ज्या बौद्ध समाजाच्या लोकसंख्येच्या जीवावर हा मतदारसंघ राखीव झाला. शेवटच्या टप्पा असूनही दोन्ही पक्षाने बौद्ध समाजाला जाणून-बुजून उमेदवारी पासून वंचित ठेवल्यामुळे येथील बौद्ध समाज प्रचंड नाराज झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील तमाम बौद्ध बांधवांनी येणाऱ्या 20 तारखेच्या मतदानावर बहिष्कार टाकावा असे आवाहन देवळाली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे उत्तर महाराष्ट्राचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी केले आहे.
त्यांनी पुढे म्हणाले की शिवसेना सह भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये आमच्या बौद्ध समाजाचे तुल्यबळ असे पदाधिकारी असूनही त्यांना जाणून-बुजून डावले असून दोन्हीही पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या फक्त नावाचा उपयोग केला आहे. निळ्या झेंड्याचा फुकट वापर करत असून वीस वर्षाच्या कालखंडामध्ये बौद्ध समाजाला काहीच मिळाले नाही. सत्तेमध्ये वाटा मिळाला नसून शिष्यवृत्तीसह चैत्यभूमीचा व नागपूर दीक्षाभूमी चे विकासाचे प्रश्न दोन्हीही सरकारने त्यांच्या काळामध्ये पूर्ण केले नाही . या दोन्ही पक्षांनी बौद्ध समाजाची फार मोठी फसवणूक केली आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये चळवळीच्या केंद्र म्हणून श्रीरामपूर तालुका महाराष्ट्र राज्य मध्ये प्रसिद्ध असून अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आंबेडकर जयंती मोठ्या थाटामध्ये साजरी होत असून येथे असणारे आंबेडकर चळवळीतील सर्व पक्षाचे मोठमोठे गट असून व त्या गटाचे प्रमुख दररोज जनतेचे प्रश्नावर बोलत असून विविध आंदोलन व विविध प्रश्नांची मांडणी शासनाकडे मागणी करत असून ज्या लोकांचे या मतदारसंघांमध्ये काहीच योगदान नाही. तसेच ज्यांच्या घरांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही जे बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणावर वीस वर्षे आमदार खासदार झाले या तालुक्यातील त्यांनी तालुक्यातील एकाही बौद्ध विहाराला व स्मारकाला एक रुपयाच्या निधी दिला नसून ती लोक आज चळवळीची गप्पा मारत आरक्षणाचा चुकीचा फायदा घेत असल्याचा आरोप भाऊसाहेब पगारे यांनी केला आहे त्यामुळे आम्ही येथून पुढील काळामध्ये प्रचार करायला ऐवजी आम्ही दोन्ही पक्षाला बौद्ध समाजाने मतदान करू नये अशी जनजागृती रथ श्रीरामपूर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये फिरवणारा असून फक्त आंबेडकर चळवळीतील जे उमेदवार उभे असतील त्यांनाच आपण मतदान करावे महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही पक्षाला मतदान करू नये असे आवाहन करणार आहे. आता बौद्ध समाजाला संधी आली असून त्या संधीचा सोनं बौद्ध समाजाने करावे व दोन्ही पक्षाचे उमेदवार पाडून टाकावे व त्यांना त्यांची जागा दाखवावी असे आवाहन भाऊसाहेब पगार यांनी केली.
यावेळी भाऊसाहेब पगारे यांनी श्रीरामपूर तालुक्यामध्ये महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली असून या पत्रकार परिषदेसाठी आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचे ज्या बैठकीमध्ये स्थानिक आमदार असं मागे जे आमदार निवडून आले श्रीरामपूर तालुक्यात त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न सोडविला नसून श्रीरामपूर तालुक्यामध्ये असणारे साखर कारखाने सूत गिरण्या खंड करीत जमिनी आधी महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून सर्वात महत्त्वाचा प्रश्न श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे होता. कारण श्रीरामपूर मध्ये रेल्वे स्टेशन आरटीओ ऑफिस अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय आदि महत्वाचे कार्यालय असूनही श्रीरामपूर श्रीरामपूर तालुका विकसित होण्यासाठी कोणतेही प्रयत्न विद्यमान आमदार आणि मागील निवडून आलेले आमदारांनी केलेले नाही हे फक्त सयाजीराव असून दुसऱ्याच्या सांगण्यावर उड्या मारणारे लोक आहेत. त्यामुळे येथे यांना व प्रस्थापित राज्यकर्त्यांना श्रीरामपूरच्या चळवळीचे व काम करणारे लोक लागत नसून बिगर कामाचे लोक लागतात कारण ते त्यांचा ऐकतात त्यामुळे येथील बौद्ध समाजाने ठरवले असून यापुढील काळामध्ये दोन्ही पक्षाला मदत न करता 100% बेचकर टाकायचा असा ठराव या बैठकीमध्ये करण्यात आला आहे.