पोहेगांव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील ऋषी अमृत संकलन केंद्राच्या वतीने दूध उत्पादकांना प्रति लिटर मागे एक रुपया वीस पैसे रिबिट तर दिवाळी सणाच्या निमित्ताने थेट वस्तू व मिठाईचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यायाधीश मेघराज जावळे होते.
यावेळी द्वारका डेरी फार्मचे संस्थापक परसराम होन, निरंजन गुडघे,चिलु जावळे,ऋषी अमृत संकलन केंद्राचे व्यवस्थापक सागर जावळे, कल्याण जावळे ,आप्पासाहेब जावळे, धोंडीराम जावळे, रावसाहेब जावळे, श्रीकांत जावळे ,लक्ष्मण खरात, आबासाहेब जावळे, योगेश जावळे, अण्णासाहेब जावळे, दत्तू कांदळकर, सोमनाथ शिंदे, सोमनाथ दहे अदी उपस्थित होते.
चालू आर्थिक वर्षात सर्वाधिक दूध पुरवठा करणारे अनिल गुडघे, विकास माळी व लक्ष्मण जावळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी सर्वांचे आभार ऋषिकेश जावळे यांनी मानले.