बुलडाणा : (प्रतिनिधी )-
विधवा परितक्ता व एकल महिलांच्या समस्या मोठ्या आहे. या महिलांसाठी मानस फाउंडेशनचे प्राध्यापक डी.एस. लहाने यांनी काम चालविले आहे. हा स्तुत्य उपक्रम असून या महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावे, असे फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या जयश्रीताई शेळके यांनी म्हटले आहे.
बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या सामाजीकजान असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी महिलांसाठी भरीव कार्य केले आहे. बचत गट चळवळीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून त्या महिलांना स्वावलंबी करण्याच प्रयत्न करीत आहे. बचत गट प्रदर्शनेच्या माध्यमातून गृह उद्योगांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने ठेवला आहे. त्याचबरोबर आता विधवा महिलांसाठी देखील भरीव प्रयत्न करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मी स्वतः एक महिला आहे, त्यामुळे महिलांच्या अडचणी मी अधिक जवळून पाहिल्या आहे.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये विधवा व एकल महिलांची संख्या मोठी आहे. या महिलांचे अनेक प्रश्न आहे.सामाजिक कुचंबने बरोबर त्यांना आर्थिक कुचुंबना सहन करावी लागते. कुटुंबात कमावते कोणी नसेल तर अशा महिलांना हातभार देणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सार्वत्रिक पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. त्यातही बुलडाण्यातील मानस फाउंडेशनचे प्रा. डी.एस. लहाने यांचे प्रयत्न भरीव असून या महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.