अनिल वीर, सातारा : जिल्हा भारतीय बौद्ध महासभा (पश्चिम अंतर्गत) महिला कार्यकारिणी पदाधिकारी निवड कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.त्याप्रमाणे जिल्हाध्यक्षपदी संगीता मंगेश डावरे (सातारा) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असुन इतर निवडी पुढीलप्रमाणे आहेत.
सरचिटणीस-नेहा विजयकुमार गायकवाड (पाटण), कोषाध्यक्षा-प्रतिक्षा किरण कांबळे (सातारा),उपाध्यक्षा (संस्कार)-सुजाता बाळू गायकवाड(सातारा),उपाध्यक्षा (पर्यटन प्रचार)-कल्पना विश्वनाथ जगताप(वाई),उपाध्यक्षा(संरक्षण एसएसडी)-अनिता विजय कांबळे (जावळी),हिशोब तपासणीस-मयुरी संतोष गायकवाड(जावळी),कार्यालयीन सचिव-संध्या पोपट यादव (वाई), सचिव(संस्कार)-अश्विनी सचिन वाघमारे(कराड),सचिव(पर्यटन प्रचार)-तनुजा संजय मोरे(वाई) व आशा संतोष भालेराव (महाबळेश्वर),सचिव(संरक्षण एस.एस.डी.)-नलिनी कांबळे व कल्पना विनायक कांबळे (सातारा),संघटक म्हणून स्मिता भास्कर मोरे(वाई),रुपाली बाबुराव गाडे(जावळी),निर्मला विलास कांबळे(सातारा),रुपाली सुनील सपकाळ(महाबळेश्वर) व जगुबाई दगडू गुजर(पाटण) यांच्याही निवडी झालेल्या आहेत.
सदरच्या निवडी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यक्षा स्वातीताई शिंदे यांच्या आदेशानुसार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (मिलिंद हौसिंग सोसायटी, सदर बझार) येथे आजी-माजी जिल्हा, तालुका,मान्यवर,उपासक व उपासिका यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, जावळी, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील महिला मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या. उत्स्फूर्त सहभाग वाढविण्यासाठी सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव,सरचिटणीस दिलीप फणसे,कोषाध्यक्ष सचिन आढाव व कार्यकारिणी पदाधिकारी यांनी केल्याप्रमाणे सर्व तालुकाध्यक्ष,सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष यांनी आपापल्या तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांना जिल्हा कार्यकारिणीसाठी महिलांसह उपस्थीत होते.