पीक पंचनामे होऊनही बळीराजा भरपाईच्या प्रतीक्षेत

0

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची भारतीय किसान संघ परिवारामार्फत मागणी

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात पिंपरी खुर्दमधील वाघळूद या या शिवारातील भागांमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. यामध्ये कापूस, मका, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले. ही पिके पाण्यात बुडाली. विशेष म्हणजे या पिकांचे संबंधित अधिकारी वर्ग पंचनामेदेखील करून गेले आहेत. परंतु अद्याप संबंधित शेतकऱ्यांना पंचनामा नंतर मिळणारी नुकसानभरपाई मिळालेली नाही. ही नुकसानभरपाई लवकरात लवकर अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान संघ परिवारातील शेतकर्‍यांनी केली आहे. तरी प्रशासनाने या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची तात्काळ दखल घेत त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

या निवेदनावर अनिल पाटील, सुंदराबाई पाटील, रेखा पाटील, उर्मिलाबाई पाटील, लीलाबाई पाटील, प्रदीप पाटील, प्रदीप पाटील, भगीरथ पाटील, सुधीर कुलकर्णी, यमुनाबाई भगीरथ पाटील, रितल चौधरी, किशोर पाटील, राजेंद्र पंढरीनाथ पाटील, बाळकृष्ण पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यांनी ही मागणी केली आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी नुकसान झाल्यानंतर पिकांचे पंचनामे धरणगाव तालुका कृषी अधिकारी देवमाने साहेब तसेच कृषी सहाय्यक योगेश पाटील, आदित्य महाजन, पद्माकर पाटील आणि तलाठी मॅडम यांनी केले होते. मात्र अद्यापपर्यंत या नुकसानाची भरपाई अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने त्या शेतकऱ्यांनी भरपाई संबंधित प्रशासनाने तात्काळ द्यावी, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here