बिजवडी : माझ्यावर बिनबुडाच्या टीका करणाऱ्या विरोधकांनी जरा बेताने बोलावे. प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाहणाऱ्या घार्गेंनी डॉ. येळगावकरांकडून इथेनॉल प्रकल्प मातीमोल किमतीला घेतला. अवाढव्य रकमेचा विमा उतरवून त्यात स्फोट घडवला. त्यात एक जीवही गेला. उसाच्या काटेमारीत तर राजरोसपणे शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. इथेनॉल प्रकल्पावर आणि काही कार्यकर्त्यांच्या घरी रात्रीस कोणते खेळ चालतात, हे आम्हाला सांगायला भाग पाडू नका, असा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला.
माण तालुक्यातील गावभेटीदरम्यान जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. आमदार गोरे म्हणाले, ”मतदारसंघाचे आणि जनतेचे देणेघेणे नसलेले आणि फक्त कुटुंबाच्या विकासाचा ध्यास घेतलेले प्रभाकर घार्गे माझ्या विरोधात उभे राहून निवडणूक का लढवत आहेत. त्यांचा अजेंडा कोणता आहे हे त्यांना आणि ठरलयवाल्या टोळक्यालाही माहीत नाही. एक तर त्यांनी कोणत्याच गावात एकही विकासकाम केले नाही. त्यांची तशी कुवतही नाही. त्यांचा पक्ष आणि त्यांचे नेते माण- खटावच्या पाणी योजनांविषयी काहीच करू शकले नाहीत आणि यापुढेही करणार नाहीत. जनताही त्यांना स्वीकारायला तयार नाही.
आज माझ्या विरोधकांमध्ये मतभेद असल्याने त्यांची घार्गेंशी भांडणे सुरू आहेत. वेगवेगळ्या डीएनएचे लोक मारून मुटकून एकत्र आल्यावर जे होते तेच आता माण-खटावच्या महाविकास आघाडीत सुरू आहे. ही निवडणूक माण-खटावचा स्वाभिमान, अस्मिता, दुष्काळमुक्ती, औद्योगीकरण विरुद्ध आमचं ठरलयवाले लाचार आणि तळवे चाटू अशी आहे. माझ्यासाठी ही निवडणूक मायबाप जनतेनेच हाती घेतली आहे. गावोगावी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.”
‘महाराष्ट्र लुटून गुजरातचा विकास करणाऱ्या बाप-लेकांना सिंधुदुर्गात थारा देऊ नका’; उद्धव ठाकरेंचा राणे घराण्यावर हल्ला
लाडक्या बहिणींना आमचे सरकार महिना १५०० वरून आता २१०० रुपये देणार आहे. महिन्याला २५ हजार, तर पाच वर्षांत सव्वालाख रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. महिलांंना एसटीचे अर्धे तिकीट आहे. सुकन्या, तसेच लखपती कन्या योजना सुरू आहेत.
रेशनिंगचे धान्य मोफत मिळत आहे. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्याचा सन्मान निधी मिळत आहे. मोफत वीज पुरविण्यात येत आहे. आता तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. आमच्या सरकारने समाजातील प्रत्येक घटकासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत माण-खटावची जनता विकासपर्वाला आणि दुष्काळमुक्तीच्या अंतिम लढ्याला साथ देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी दगाबाजी केली अन् काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले’; विनोद तावडेंचा घणाघात
जनताच मैदानात उतरली…
निवडणूक अंतिम टप्प्यात आली, तरी माण-खटावमधील महाविकास आघाडीचे आमचं ठरलयवाले प्रभाकर घार्गेंना उमेदवार मानायला तयार नाहीत. आताही ते एकमेकांशी हमरीतुमरीवर येऊन भांडत आहेत. ते निवडणूक कशासाठी लढत आहेत, हेच त्यांना माहीत नाही. आमच्याकडे मात्र, जनताच निवडणूक हातात घेऊन मैदानात उतरली आहे. लाडक्या बहिणीची लाडक्या भावांच्या महायुतीचे सरकार आणायला सरसावल्या असल्याचेही आमदार गोरे यांनी सांगितले.