उत्सव लोकशाहीचा जागर मतदानाचा

0

लोधवडे प्राथ.शाळेची गावातून मतदान जन जागृतीपर फेरी

गोंदवले –  सातारा जिल्हा माण तालुक्यातील आदर्श लोधवडे गावच्या प्राथमिक शाळेने उपक्रमशील प्राथमिक शिक्षक सतेशकुमार मारुती माळवे यांच्या प्रभावी नियोजनात व मुख्याध्यापक महादेव ननावरे यांच्या कुशल मार्गदर्शनात लोधवडे गावात मतदान जन जागृतीच्या फेरीचे नुकतेच आयोजन केले.

   

या मतदान लोक जागृती फेरीत विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.यामध्ये नागरिकांना येणाऱ्या वीस नोव्हेंबर चोवीसच्या महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणूकीत मतदानाचे आवाहन,प्रबोधन आणि प्रवृत्त करणारे फेलक्स बॅनर व फ्लॅश कार्डे विद्यार्थ्यांनी हाती घेत,मतदार राजा जागा हो ! लोकशाहीचा धागा हो !,आपले मत आपला अधिकार,चला मतदान करू या ! लोकशाही रुजवू या !,आपले मत आपले भविष्य ,आद्य कर्तव्य भारतीयांचे पवित्र कार्य मतदानाचे व मतदानासाठी वेळ काढा,आपली जबाबदारी पार पाडा. यांसारख्या घोषणाबाजीत गावात जल्लोषी मतदान फेरी काढण्यात आली.आपल्या भारत देशाची लोकशाही सशक्त,मजबूत करण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढीस लावण्याकरिता मतदान जागृती फेरीच्या राष्ट्रीय पवित्र कार्यपर अशा या खास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

 तसेच बालदिनानिमित्त आंनदी अध्यापनाशिवाय विद्यार्थ्यांनाच्या सुप्त कला गुणांना वाव देणारे आणि त्यांचा आनंद द्विगुणित करणारे विविध बाल स्नेही उपक्रम लोधवडे प्राथमिक शाळेत साजरे करण्यात आले. यामध्ये स्टिक बॅलन्सिंग,ऑक्टोप्स रेस, संगीत खुर्ची स्पर्धा व मुक्त रेकॉर्ड डान्स यांसारखे फणी गेम्स घेण्यात आले.बालदिनाची आठवण म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्पाचे वाटप करून, त्यांचे छान कौतुक केले. 

   अशा प्रकारे उत्सव लोकशाहीचा जागर मतदानाचा जन जागृतीपर उपक्रम आणि विविध बाल आनंदी उपक्रमांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक महादेव ननावरे,सह शिक्षक दिपक कदम,सतेशकुमार माळवे, सुचिता माळवे,संध्या पोळ, दिपाली फरांदे व मनिषा घरडे यांनी उत्स्फूर्तपणे व सक्रिय सहभाग घेतला.शेवटी सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here