जामखेड तालुक्यात मतदान शांततेत संपन्न 

0

जामखेड तालुका प्रतिनिधी – कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी सकाळपासून मतदारांचे उत्साहाचे वातावरण असे दिसून आले. जामखेड तालुक्यातील खर्डा, जवळा, नान्नज, अरणगाव, साकत सह शहरातील आरोळेवस्ती जिल्हा परिषद शाळा , नवीन नगरपरिषद कार्यलय ,वाचनालय इमारत, जिल्हा परिषद मराठी शाळा,ल ना होशिंग विद्यालय , एस पी  इंग्लिश स्कूल, उर्दू शाळा , नागेश विद्यालय  याभागात सकाळच्यावेळी मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा होत्या. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक होते. सकाळपासून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून अद्याप पर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.

 

मतदान सुरू झाल्यापासून पहिल्या दोन तासात ६.३४ टक्के मतदान झाले आहे. तर दूपारी ३ पर्यत पर्यत ५१. १६ टक्के मतदान झाले. दूपार १ नंतर मतदानावर गर्दी ओसरली असून सायंकाळी ४ नंतर मतदार हळुहळू बाहेर पडत आहे. त्यामुळे पुन्हा या मदतान केंद्रावर गर्दी होत असल्याचे चित्र मतदार संघात दिसत आहे.

यामुळे विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार रोहित पवार राष्ट्रवादी ( शरद पवार ) आणि महायुती कडून भाजपचे राम शिंदे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. दरम्यान राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला होता. त्यानंतर आज कर्जत येथे भाजप कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरू असल्याचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी प्रसारित केला. यामुळे मतदारसंघातील वातावरण तापले होते.

मात्र मतदान दिवशी सकाळपासून मतदान केंद्रावर शांततेत प्रक्रिया सुरू होती.यावेळी मतदार म्हणाले, बरेच नवीन  मतदारांसहीत ज्येष्ठ नागरिकांनी ही मतदान केल्यानंतर लोकशाहीच्या या उत्सवात आतापर्यत ज्यानी नेक काम केले आहे अशाच उमेदवारांना मतदान केले आहे असे सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.  कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी सकाळपासून मतदारांचे उत्साहाचे वातावरण असे दिसून आले. शहरातील आरोळेवस्ती जिल्हा परिषद शाळा , नवीन नगरपरिषद कार्यलय ,वाचनालय इमारत जिल्हा परिषद मराठी शाळा,ल ना होशिंग विद्यालय , एस पी  इंग्लिश स्कूल, उर्दू शाळा , नागेश विद्यालय  याभागात सकाळच्यावेळी मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी रांगा होत्या. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक होते. सकाळपासून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून अद्याप पर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here