“एक सुलभ नेतृत्व संच कर्मचाऱ्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करतो: उन्मेष वाघ

0

उरण दि 30(विठ्ठल ममताबादे )भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाने (जनेप प्राधिकरण) शुक्रवारी, 29 नोव्हेंबर 2024 रोजी प्रमुख बंदरांच्या सचिवांच्या परिषदेचे आयोजन केले होते. या दोन दिवसीय परिषदेत प्रमुख बंदरांचे प्रतिनिधी आणि पत्तन, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या परिषदेचे उद्घाटन जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष, उन्मेष शरद वाघ भा.रा.से., यांनी संदीप गुप्ता, संयुक्त सचिव, पत्तन, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय, पी. के. रॉय, संचालक (पीएचआरडी) आणि श्रीमती. मनीषा जाधव, महाव्यवस्थापक (प्रशासन) आणि सचिव, जनेप प्राधिकरण या मान्यवरांच्या उपस्थितीत केले.

आपल्या उद्घाटनपर भाषणात, जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष, उन्मेष शरद वाघ भा.रा.से., यांनी बंदर क्षेत्रातील सहकार्य आणि नवोन्मेषासाठी जनेप प्राधिकरणाचे समर्पण अधोरेखित केले. ते म्हणाले, “ज्ञान सामायिकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पत्तन क्षेत्र आणि त्याचे कार्यबल उंचावण्याकरता सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी जनेप प्राधिकरणाने प्रमुख पत्तनांच्या सचिवांची परिषद घेण्यास सुरुवात केली आहे. आमचा ठाम विश्वास आहे की कर्मचारी, विभागप्रमुख आणि नेतृत्वाचा प्रेरित, उच्च-उत्साही संघ उल्लेखनीय टप्पे गाठू शकतो. भारताचे सर्वात कार्यक्षम पत्तन म्हणून, जागतिक मानकांच्या बरोबरीने स्पर्धा करत, जनेप प्राधिकरण आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, उद्योग कार्यक्रम आणि कामगारांचे कौशल्ये वाढविण्यासाठी आणि त्यांची कामगिरी ओळखण्यासाठी नियमित प्रशिक्षण कार्यक्रमांच्या आयोजनाला प्राधान्य देते.”

सर्वसमावेशक नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, “एक सुलभ नेतृत्व संच कर्मचाऱ्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करतो, ज्यामुळे त्यांना आपल्याही महत्व दिले जात असल्याची आणि आपले ऐकले जात असल्याची भावना निर्माण होते. या अधिवेशनाच्या माध्यमातून, कर्मचाऱ्यांसाठी प्रमोशनल कॅलेंडर तयार करणे, प्रशिक्षण वेळापत्रक तयार करणे आणि आंतरराष्ट्रीय पत्तनांसह सहयोगी विनिमय कार्यक्रम शोधणे यासारख्या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. नियमित अधिवेशने आणि वार्षिक विभागीय परिषदा या उपक्रमाला आणखी समृद्ध करतील.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here