महाबळेश्वर प्रतिनिधी : मथुरा उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील क्रिकेटपटू प्रज्वल प्रसाद कात्रट,सुदेश लक्ष्मण घाडगे, फैजान आसिफ शारवान यांची 19 वर्षाखालील संघात निवड झाली आहे.
नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्याच्या संघातून या तिन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्र संघात आपले स्थान निश्चित केले आहे. तालुक्यातील क्रिकेट प्रेमींनी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र स्पोर्ट्स अकादमीचे कार्याध्यक्ष राहील वारुणकर, सचिव व क्रीडा शिक्षक मुनसिफ वारुणकर यांच्या मार्गदर्शन व विशेष प्रयत्नाने तालुक्यातील खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पाठवण्यात यश आले आहे.