गटशिक्षणाधिकारी लक्ष्मन पिसे व अधिव्याख्याता कोकरे यांची म्हसवड जि.प.शाळा नंबर१ ला सदिच्छा भेट

0

गोंदवले – 

आज बुधवार दिनांक 4/12/2024 रोजी village go to school उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसवड नंबर १ या ठिकाणी डायट चे अधिव्याख्याता विजयकुमार कोकरे व माण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे यांनी शाळेत भेट दिली. त्यावेळी त्यांनी लोकसहभाग करून शाळेचा कायापालट, रंगरूप बदलण्यासाठी आवाहन केले त्या आवाहनास प्रतिसाद देत सर्व शिक्षक स्टाफ यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये वर्गणी जमा करण्याचे ठरले.

त्याप्रमाणे आठ शिक्षकांनी त्वरित आवाहनास प्रतिसाद देत प्रत्येकी 5000 प्रमाणे 40000 रुपये वर्गणी शाळेमध्ये जमा झाली. कोकरे व पिसे या दोघांनीही सर्व शिक्षकांचे वैयक्तिक अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here