देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
राहुरी न्यायालयामध्ये वकील व्यवसायाच्या करणाऱ्या आढाव दाम्पत्यांचा खूनाची सुनावणी सोमवार दि.9 रोजी होणार अहिल्यानगर जिल्हा सञ न्यायालयात होणार असुन या खटल्याचे कामकाज सरकारी वकील म्हणून अँड उज्वल निकम हे पाहणार आहेत.अँड निकम या खुना मागिल महत्वपुर्ण माहिती मांडणार आहे. या खटल्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राहुरी न्यायालयात वकीली व्यवसाय करणारे आढाव दाम्पत्यांचा खून झाला. या दोघा पती-पत्नीचा मृतदेह उंबरे (ता. राहुरी) येथील स्मशानभुमीतील विहीरीत आढळला होता. ॲड. राजाराम जयवंत आढाव (५२) व ॲड. मनिषा आढाव असे या दाम्पत्याचे नाव आहे.
वकिल दांम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करुन खुन करणारा सराईत आरोपी व त्याचे ०३ साथीदार मृतदेह सापडल्या नंतर २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलिसांना यश मिळाले होते.ताब्यात घेतलेले चौंघा पैकी दोन जण सराईत गुन्हेगार असल्याने या खुनाचा खरा मास्टरमाईंड कोण याचा शोध घेणे पोलीसां समोर आवाहन होते.
ॲड. राजाराम जयवंत आढाव, वय ५२ वर्षे, तसेच ॲड. मनीषा राजाराम आढाव, वय ४२ वर्षे, हे वकिल दाम्पत्य राहुरी तालूक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथे राहत होते. ते दोघेही राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. ॲड. राजाराम आढाव हे काल दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी दुपार पर्यंत राहुरी येथील न्यायालयात त्यांचे कामकाज करुन दुपारी दोन वाजे दरम्यान ते अहमदनगर येथे गेले होते. त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांच्या पत्नी ॲड.मनीषा आढाव यांना बोलावून घेतले.अशी माहिती मिळाली होती. तेव्हापासून आढाव हे दोघे पती पत्नी बेपत्ता आहेत. दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी पहाटे दोन वाजे ॲड. राजाराम आढाव यांची फियस्टा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम एच १७ ए इ २३९० ही गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवारस मिळून होती. पहाटे पोलिस पथक गाडी जवळ पोहचले तेव्हा त्यावेळी ॲड.आढाव यांच्या गाडी जवळ दुसरी एक डस्टर गाडी उभा होती. मात्र पोलिस गाडी आल्याचे पाहताच सदर डस्टर गाडी त्या ठिकाणाहून सुसाट वेगात निघून गेली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ॲड.आढाव यांची चारचाकी गाडी ताब्यात घेतली. त्या गाडीची तपासणी केली असता गाडीत एक हातमोजा, दोर व एक बूट आढळून आला. तपासा दरम्यान पोलिस पथकाला आज दुपारी १२ वाजे दरम्यान आढाव यांची दुचाकी क्र. एम एच १७ ए डब्लू ३२०७ ही गाडी राहुरी येथील न्यायालयाच्या मागील परिसरात बेवारस मिळून होती. तसेच आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँके समोर बेवारस मिळून होते.
खुनाच्या घटनेनंतर अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक व राहुरी पोलीस पथक आढाव दाम्पत्यांचा शोध घेतला.पोलिस पथकाने मानोरी ते राहुरी जाणारे रोडवरील तसेच राहुरीकोर्ट परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज, तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व वकिल दांम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकिलपत्र आहेत याबाबत माहिती घेत असतांना राहुरी कोर्ट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयीत कार दिवसा व रात्रीचे वेळी गेलेली असल्याचे दिसुन आले. सदर कारचा शोध घेत असतांना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशींग रा. राहुरी याचे वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकिल दांम्पत्याकडे असल्याचे व सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसुन आले संशयीत कार किरण दुशींग वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्या नंतर सदर डस्टर गाडीचा शोध घेऊन उंबरे येथील किरण दुशिंग व आणखी तीन जण अशा चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी घटनेची माहिती दिली. संशईत म्हणून पकडलेले दोघे सराईत गुन्हेगार असल्याने खुनाचा मास्टर माईंड कोण याचा शोध घेणे पोलीसां समोर आवाहन होते.
पोलीस पथकास किरण दुशींग याची मागील गुन्हेगारी पार्श्वभुमी माहित असल्याने त्यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे रा. येवले आखाडा, ता. राहुरी, जि. अहमदनगर, शुभम संजीत महाडिक रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी, हर्षल दत्तात्रय ढोकणे रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर, बबन सुनिल मोरे रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर यांचेसह कट करुन वकिल यांना कोर्ट केसच्या कामकाजाकरीता बोलावुन घेतले. त्यांना किरण दुशींग याने स्वतःचे गाडीत बसवुन वकिल दांम्पत्यांचे घरी घेवुन जावुन त्यांचे घरामध्ये दोघांचे हात पाय बांधुन ठेवुन ५ लाख रुपये खंडणीची मागणी केली. परंतु वकिल दांम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच घरामध्ये ५ ते ६ तास त्यांचा छळ केला. त्यानंतर त्यांना वकिल दांम्पत्याचे गाडीमध्ये बसवुन त्यांना मानोरी गावाचे बाहेर घेवुन जावुन रात्रीचे सुमारास दोघांचे डोक्यामध्ये प्लॅस्टीक पिशव्या घालुन त्यांचा श्वास गुदमरुन खुन केलेबाबत व त्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभुमीचे जवळ असलेल्या विहीरीमध्ये दगड बांधुन टाकुन
दिले होते.
किरण दुशींग,भैया उर्फ सागर साहेबराव खांदे,शुभम संजीत महाडिक, हर्षल दत्तात्रय ढोकणे,बबन सुनिल मोरे आदी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असुन त्याची सुनवणी जिल्हा सञ न्यायालयात सोमवार दि.9 पासुन सुरु होणार आहे.सरकार पक्षाच्या वतीने अँड उज्वल निकम हे कामकाज पाहणार आहेत.