रखडलेल्या सोनेववाडी गणपती मंदिराच्या कळसाच्या कामासाठी माजी सरपंचाकडून ५१ हजार रुपये 

0

मंदिर बांधकाम कृती समिती लोकवर्गणी जमा करणार 

पोहेगांव (प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील गणपती मंदिराचा कळस आकर्षक व्हावा म्हणून मंदिर बांधकाम कृती समितीच्या वतीने जुना असलेल्या कळस पाडण्यात आला. सोनेवाडी अखंड हरिनाम सप्ताहातुन ग्रामस्थांनी या कळसासाठी ५१ हजार रुपये दिले. मात्र दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने दोन तीन लाखात पूर्ण होणारे काम साडेचार लाखावरती गेले. वर्गणी चा श्रोत कमी झाला. मंदिराचा कळस व्हावा ही गावकऱ्यांची तीव्र इच्छा मात्र पुढाकाराची कमी यामुळे काम रखडले. मात्र काल पुन्हा एकदा सोनेवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच पांडुरंग काशिनाथ जावळे पुढे सरसावले त्यांनी ५१ हजार रुपयांची देणगी या मंदिराच्या कळसासाठी जाहीर केली. मंदिर कृती समिती देखील आता पुढे सरसवली असुन लोक वर्गणीला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

गणपती मंदिराचा कळस पाडल्यानंतर गावात महिलांना पापड व कुर्डया करण्याचे दोन-तीन वर्षापासून थांबले आहे. मंदिर कृती समितीने लवकरात लवकर मंदिराचा कळस पूर्ण केला तर या अडचणी दूर होतील. काल माजी सरपंच पांडुरंग जावळे यांनी मंदिर समितीच्या सर्व सदस्यांना मंदिराचे काम लवकर लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले. 

यावेळी मंदिर बांधकाम कृती समितीचे सदस्य सोनेवाडी हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष धर्मा जावळे, सोनेवाडी पतसंस्थेचे संस्थापक किशोर जावळे, कल्याण जावळे ,शांताराम जावळे, हेमराज जावळे, विठ्ठल जावळे, बि डी जावळे, भाऊसाहेब जावळे, साहेबराव पोतकुले, भिकाजी मिंड, शांताराम जावळे, दत्तात्रेय कांदळकर आदी उपस्थित होते.

मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी व सभा मंडपासाठी शिवसेनेचे नेते धर्मा जावळे , युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख कर्णा जावळे यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना साकडे घातले असून खासदार वाकचौरे यांनी देखील चार लाख रुपये या मंदिराच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र मंदिराच्या कळसाचे काम जवळपास दोन तीन वर्षापासून रखडले असल्याने ते पूर्ण करण्याचे आव्हान गणपती मंदिर कृती समितीच्या पुढे उभे राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here