विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी माफीचा साक्षीदाराची घेतली तपासणी
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
राज्यामध्ये गाजलेल्या नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील दोन वकिलांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज नगर येथील न्यायालयामध्ये सुरू झाली. सरकारी पक्षाच्या वतीने या घटनेतील माफीचा साक्षीदार त्याची आज न्यायालयासमोर तपासणी झाली व त्याने या हत्याकांडाचा घटनाक्रम आज येथील मुख्य जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या समोर मांडला. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी त्याची तपासणी घेतली. सलग दोन दिवस या घटनेची सुनावणी सुरू राहणार आहे.
रहुरी न्यायालयात वकीली व्यवसाय करणारे आढाव दाम्पत्यांचा खून झाला. या दोघा पती – पत्नीचा मृतदेह उंबरे (ता. राहुरी) येथील स्मशानभुमीतील विहीरीत आढळला होता. ॲड. राजाराम जयवंत आढाव (५२) व ॲड. मनिषा आढाव (वय ४२) असे या दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकरणात सरकारी साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे हा आरोपी आणि माफीचा साक्षीदार आहे. आरोपी किरण नानाभाऊ दुशिंग,भैय्या ऊर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम महाडीक, बबन सुनील मोरे यांचा आरोपीमध्ये समावेश आहे.
या हत्याकांड प्रकरणांमध्ये आरोपी हर्षल ढोकणे याने सरकारी पक्षाला सर्व माहिती आपण देण्यास तयार आहोत, असे सांगितल्यानंतर त्याला आज न्यायालयासमोर हजर केले. तो माफीचा साक्षीदार झाला आहे. हर्षद याने यावेळी न्यायालयासमोर सर्व हत्याकांड्या संदर्भात पहिल्यापासून झालेला घटनाक्रम त्यांनी न्यायालयासमोर मांडला. यामध्ये त्यांनी आपण एस वाय बी कॉम ला शिक्षण घेत असून आपलं मूळ गाव उंबरे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याने आपली ओळख बबन मोरे यांच्याशी झाली व आपण त्यांना ओळखत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेतील चारही इतर आरोपींना आपण ओळखत आहोत असे म्हणत त्यांनी त्यांची गावाची ठिकाणे व नावे यावेळी न्यायालयासमोर सांगितले.
यावेळी हर्षल ढोकणे हा प्रसाद शुगर या ठिकाणी ऊस काट्यावर नोकरी करत आहे. गुन्हा घडण्याच्या तीन महिने अगोदर पासून मी या ठिकाणी नोकरी करत असल्यास त्याने यावेळी सांगितले. 24 जानेवारी 2024 रोजी बबन मोरे यांचा मला फोन आला की उद्या आपल्याला गेम करायचा आहे. तू रॉयल पॅलेस या ठिकाणी ये असे सांगितले. त्याचा आपल्याला फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. मी परत बबन ला फोन केला तेव्हा बबन याने तू ये आपल्याला सर्वांना एक गेम करायचा आहे. त्यात तुला पण पैसे मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले. व त्याने नंतर हा फोन शुभम महाडिक याला दिला. शुभम याने या ठिकाणी आम्ही आल्यानंतर वकिलांना फोन लावण्यास सांगितले. व म्हणाला पाथर्डी कोर्टात जामीन साठी जायचे आहे. त्यानंतर आम्ही पाच जण गाडीमध्ये बसलो. आम्हाला मोबाईल बंद करण्यास सांगितले. नंतर आम्ही सर्वजण राहुरी न्यायालयासमोर आलो. त्यानंतर किरण व शुभम हे वकिलांना आणण्यासाठी गेले. वकील आल्यानंतर त्यांना गाडीमध्ये पुढे बसले व आम्ही चार जण मागे बसलो. त्यानंतर आम्ही निघत असताना किरण हा गाडी चालवत होता. ब्राह्मणीच्या अलीकडे माऊली हॉटेलच्या जवळ एक निर्जळ स्थळी त्यांना घेऊन गेलो. त्यानंतर वकील हे गाडीमध्ये बसले असताना किरण याने त्यांचे हातपाय दोरीने बधण्यास सुरुवात केली असता त्यांनी यास विरोध केला. त्यावेळी किरण याने वकिलाला मारहाण केली.
यावेळी किरण याने वकिलांना सांगितले की तुमचा मुलगा साई याने आळेफाटा या ठिकाणी मुलीला पळून आणले आहे. हा मॅटर मिटवायचे असेल तर दहा लाख रुपये द्या. वकील यांनी मी मुलाला बोलतो, असे ते म्हणाले. त्यानंतर किरण याने तुम्ही तुमच्या पत्नीला बोलून घ्या. तिला मोहटादेवी ला जायचं आहे, असे सांगा. त्यानंतर शिवम याने वकील यांच्या फोन वरून फोन लावला त्यानंतर शुभम तुला घ्यायला येईल असे सांगितले. त्यावरून आम्ही सर्वजण पुन्हा हॉटेल रॉयल याठिकाणी गेलो. त्यानंतर एक जण राहुरी येथील न्यायालयात त्यांना आणायला गेला. त्यांना घेऊन येत असताना आम्ही पुन्हा ब्राह्मणी जवळ एक निर्जल स्थळी आलो.आल्यानंतर गाडीमध्ये त्यांना त्यांचे पती यांना बांधून ठेवल्याचे दिसले व अँड मनिषा यांनी त्या वेळेला गाडीमध्ये बसण्यास नकार दिला, त्यावेळेला किरण याने त्यांना ढकलून गाडीमध्ये बसविले. मात्र त्यांच्याकडे हात बधण्यास काही नसल्याने त्यांना एका जाणणे रुमाल आणून दिला.कोणता रुमाल होता, त्याची ओळख तुम्हाला आहे का? असे वकील उज्वल निकम यांनी त्याला विचारल्यानंतर तू ते ओळखू शकतो का असे म्हटल्यावर त्याने हो सांगितले. व न्यायालयासमोर तो सीलबंद केलेला रुमाल यावेळी दाखवण्यात आला व तो त्याने ओळखला.
यावेळी ढोकणे याने आम्ही ज्या वेळेला गाडीमध्ये होतो त्या वेळेला किरण याने राजाराम आढाव व मनीषा आढाव तुम्हीच ना, असे त्यांना विचारले. त्यावर त्यांनी हो म्हणून सांगितले. तुमचा मुलगा साई आहे ना असे त्यांना सांगितले.
चौकट
वकिलांची झाली शाब्दिक चकमक
सरकारी पक्षाचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सरकारी साक्षीदार हर्षल ढोकणे याला प्रश्न विचारताना आरोपीचे वकील यांनी त्यास आक्षेप घेतला. तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न त्याला विचारू नका तुम्ही एक प्रकारे स्टोरी तयार करून आणलेली आहे, असा आक्षेपही त्यांनी घेतला. न्यायालयाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे त्यांना प्रश्न विचारा असे सांगितले. त्यानंतर त्यांनी पुन्हा आक्षेप घेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दाखला यावेळी देऊन कशा पद्धतीने साक्षी घ्यायची याची निर्देश दिलेले आहेत, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.व त्यापुढे न्यायालयाने निकम यांना नियमितपणे आपण विचारू शकता असे सांगितले.
चौकट
माफीचा साक्षीदाराला आली चक्कर !
माफीचा साक्षीदार हर्षद ढोकणे याची साक्ष चालू असताना त्याला चक्कर आली यामध्ये सरकारी पक्षाचा साक्षीदार हर्षद ढोकणे हा खुना घटनाक्रम सांगत असताना त्याला अचानकपणे न्यायालयाच्या आवारातच चक्कर आली. व तो त्या ठिकाणी खाली बसला त्यानंतर न्यायालयाने काही काळ कामकाज तहकूब केले. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.