सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या बळवंत ढोमसेची कुस्ती स्पर्धेत विभागीय पातळीवर निवड

0

कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी बळवंत शरद ढोमसे याची कुस्ती स्पर्धेत विभागीय पातळीवर निवड झाली असल्याची माहिती माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी दिली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या वतीने सहभागी होऊन बळवंत शरद ढोमसे या विद्यार्थ्याने ६१ किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत घवघवीत यश संपादन करून सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालायचे नाव विभागीय स्थरावर उंचावले आहे. बळवंत ढोमसे याची नाशिक जिल्यातील बलकवडे व्यायाम शाळा येथे होणार्‍या आंतर महाविद्यालयीन विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत कौतुकास्पद असून आगामी विभागीय स्पर्धेत बळवंत ढोमसे हा अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी दिली आहे.

बळवंत ढोमसे याने कुस्ती स्पर्धेमध्ये मिळविलेल्या उत्कृष्ट यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे, सर्व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बळवंत ढोमसे यास महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.राजेंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here