पैठण येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाची बैठक संपन्न 

0

तालुक्यातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना

पैठण,(प्रतिनिधी): पंचायत समिती पैठण येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाची बैठक संपन्न झाली यावेळी तालुक्यातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना सर्कल निहाय देण्यात आल्या असल्याचे गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांनी सांगितले.

   

पैठण पंचायत समिती मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांची बैठक पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे,कक्ष अधिकारी किशोर निकम, रोजगार हमी कक्ष प्रमुख विजय वाघ, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आकाश भुमरे पाटील,संपत अवसरमल यांच्या उपस्थितीत   झाली.

   

यावेळी बोलताना पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांनी सांगितले की, पैठण पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या तालुक्यातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना सर्कल निहाय तांत्रिक अधिकारी यांना दिल्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या की एक महिन्या पर्यंत १०० टक्के कामे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी कार्यवाही करावी जेणेकरून तालुक्यातील अपूर्ण कामे पूर्ण होतील.

     

यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे तांत्रिक अधिकारी विजय वैष्णव,रोहन लांडगे,प्रणित निकाळजे, अभिजित शिंदे,ऋषीकेश तांगडे,राम भुकेले, दत्तात्रय शिंदे, विजय गरड, अतुल सजगणे, मिलींद खोतकर,संगणक परिचालक रविंद्र गोरडे, योगेश मानिकजडे, दत्तात्रय शिंदे, उज्वला थोरे,मोनिका बोरूडे,आरती तांगडे, गणेश बोरूडे सह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here