महाबळेश्वर पर्यावरण संवेदन क्षेत्रात मिळकती बंदीस्त करुन विकास कामे(?) जोमात 

0

 जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे कार्यवाहीची मागणी

       महाबळेश्वर:दि.१२  महाबळेश्वर तालुका पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असताना उच्चस्तरीय पर्यावरण समितीने मिळकतींना उंच पत्रे लावुन विकास कामे करण्यास तसेच अती उंच कंपाऊंङ करण्यास मनाई केल्याचे समजत असताना महाबळेश्वर – पाचगणी रस्त्यालगतची नाकिंदा,मेटगुताङ तसेच भौसे या गावांच्या मुख्य डांबरी रस्त्याला लागुन असलेल्या मिळकतींना बाहेरुन बंदीस्तकरुन कोणालाही दिसुन येणार नाही अशा रितीने उंच पत्रे,ताङपत्रीने बंदिस्त करुन विकासकामे सुरु असताना स्थानिक महसुल प्रशासनातील गावकामगार तलाठी,मंङल अधिकारी यानी केवळ काही ठिकाणचा पंचनामा करण्याचे सोपस्कार पारपाङुन मी नाही त्यातली.. .अशा पद्धतीने कार्यवाही दाखवून काही बंदिस्त केलेल्या मिळकतींचे ठिकाणची कामे मिळक धारकानी सुरु ठेवल्याचे दिसुन येत आहे.

     

मौजे नाकिंदा गावात जाताना डांबरी रस्त्याचे उजव्या बाजुची सर्वे नं.३ /४ मध्ये अवैध उत्खनन केल्यामुळे महाबळेश्वर तहसिल कार्यालयाने काही वर्षापुर्वी  रुपये पाच लाखांचा दंङ ठोठावला असताना याच मिळकतीला बाहेरुन उंच पत्रयांनी बंदीस्त करुन आतिल भागात विकासकामे सुरु असल्याचे दिसुन येत आहे.त्याच प्रमाणे मेटगुताङ गावच्या हद्दीत मुख्य राज्यमार्गा लगत हाॅटेल कोर्टयार्ङ चे ङाव्या बाजुस काही महिन्या पुर्वी दाट वृक्ष असलेल्या मिळकतीत भलेमोठे व्यावसायिक आर सी सी बांधकाम सुरु आहे.तसेच लिंगमळा वॉटरफॉल कडे जाताना रस्त्या लगत डाव्या बाजुस चार ते पाच महिन्या पुर्वी दाट वृक्षांनी दाटलेल्या मिळकतींला चारही बाजुनी उंच पत्र्यांनी बंदीस्त करुन गेले दोन ते तीन महीन्या पासुन काम सुरू ठेवून मिळकती मधील वनराई साफ करुन मिळकत मोकळी करुन आतील भागात विकासकामे सुरु असल्याचे दिसुन येत आहे.हाच प्रकार मौजे भौसेखिंङ गावच्या हद्दीत महाबळेश्वर,पाचगणी मुख्य रस्त्यालगत मॅप्रो फॅक्ट्रीच्या पुढे उजव्या बाजुला असलेल्या सर्वे नं.४१/५ अ या शेतीच्या मिळकतीला बाहेरील बाजुस उंच पत्रे व ताङपत्रीने बंदीस्त करुन आतील परिसरात विकासकामे सुरु असल्याचे दिसुन येत आहे.

या बाबत त्या गावचे स्थानिक तलाठी  मोहीते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुरु असलेले कामाचा पंचनामा करुन तहसिलदार महाबळेश्वर यांच्याकङे पुढील कार्यवाहि साठी पाठवले असल्याचे सांगितले.वास्तविक पाहता महाबळेश्वर तालुका पर्यावरण संवेदनशिल असल्याने मिळकतींना उंच पत्रे लावुन बंदिस्त करण्यास मनाई असताना देखिल यावर स्थानिक तहसिलदार महसुल प्रशासनातील गावकामगर तलाठी,मंङलाधिकारी केवळ पंचनामा करुन नोटीस बजावण्या व्यतिरिक्त सुरु असलेली अवैध विकासकामे,पर्यावरणाची हानी प्रत्यक्ष कारवाई करुन थांबवण्यास असर्थ ठरताना दिसुन येत आहेत किंवा अप्रत्यक्ष अवैध कामांना सहकार्य करत असल्याची दाट शक्यता संशय व्यक्त होत आहे. 

 

  याची दखल घेउन महाबळेश्वर- पाचगणी मुख्य राज्यमार्गा लगतची मौजे नाकिंदा,मेटगुताङ,भौसे या गावांच्या हद्दीत खाजगी मिळकतींना उंच पत्र्यांनी आणि ताङपत्रींनी बंदीस्त करुन नेमकी कोनती कामे सुरु आहेत या उंच पत्रे व ताडपत्री लावून सुरु असलेल्या कामांची जिल्हाधिकारी सातारा यांनी स्थानीक तहसीलदार, गावकामगार तलाठी, मंडल अधिकारी यांची प्रामुख्याने चौकशी कार्यवाही करुन तात्काळ उंच पत्रे व ताडपत्रीने मिळकती बंदिस्त करून सुरु असलेल्या कामांवर चौकशी करून कार्यवाही करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here