“जि.प.प्राथमिक शाळा,त्रिपुडी” स्वागत कमानही उभारली !
अनिल वीर सातारा : त्रिपुडी, ता.पाटण येथील उपसरपंच राहुल देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर, शालेय वही वाटप तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेसाठी स्वागत कमानी ची आवश्यकता होती.त्याची मागणी मुख्याध्यापक संजय देसाई यांनी केलेली होती.तेव्हा वाढदिवसाचं औचित्य साधून उपसरपंच राहुल देसाई यांनी त्याला दुजोरा देऊन तातडीने,”जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, त्रिपुडी” अशी स्वागत कमान उभारण्यात आली.
मुख्याध्यापक संजय देसाई व सर्व शिक्षिका व अध्ययनार्थी यांच्या हस्ते वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करून उपसरपंच राहुल देसाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.