बचत गटाच्या महिलांचा मोठया प्रमाणात सहभाग
उरण दि १४(विठ्ठल ममताबादे ) : महिला सक्षमीकरण करण्याकरिता जिल्हापरिषद सदस्या कुंदाताई वैजनाथ ठाकूर, चैतन्य पाटील, विश्रांती घरत यांच्या वतीने उरण तालुक्यातील चिरले गावातील सर्व महिला भगिनींच्या बचत गटांना चिरले प्राथमिक शाळेत आमंत्रित करून उद्योग समूहाबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी महिला सामाजिक कार्यकर्त्या व बचत गटाचे अभ्यासू व्यक्तिमत्व श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहायता संस्था उरणच्या अध्यक्षा रायगड भूषण संगीता ढेरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.बचत गटांनी उद्योग कसा उभा करावा , त्यासाठी लागणारा आर्थिक कसा उभा करता येईल , प्रशिक्षण कसे देता देता अश्या अनेक विषयांवर दयानंद चतुर MCED समन्वयक अलिबाग,
राजू रोटे संवेदना डेव्हलपमेंट फाउंडेशन,ओमकार भस्मे साई वेंचर या उपस्थित अधिकारी वर्गा कडुन माहिती देण्यात आली.यावेळी २२ महिला बचत गटाच्या शेकडो महिला उपस्थित होत्या.शिबिरात उपस्थित महिला अध्यक्ष्यांनी आपल्या समस्या अधिकारी मंडळी सोबत मांडून त्याच्यावर कश्याप्रकारे उपाययोजना करता येतील यांच्यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी उरण विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजितदादा पवार गट )अध्यक्ष वैजनाथदादा ठाकूर,शिवसेना वैदकीय मदत कक्ष रायगड चे जिल्हाप्रमुख चैतन्य पाटील, विश्रांती रमाकांत घरत व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच या महिलांना उरण पोलीस स्टेशनचे महिला पोलीस अधिकारी पदमजा पाटील (PSI )यांनी महिलांना सायबर क्राईम, ऑनलाईन फ्रॉड,लैंगिक शोषण, गुड टच, बॅड टच, महिला सुरक्षितता आदी विषयावर मार्गदर्शन केले.महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी त्यांना कोणत्या प्रकारे मदत करायची यावर संघटना तयार करायची आहे असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य कुंदा वैजनाथ ठाकूर, चैतन्य पाटील, विश्रांती घरत यांनी आयोजित केलेल्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमाला महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून महिलांच्या विविध समस्या, प्रश्ना विषयी मोठया प्रमाणात जनजागृती झाली आहे. चांगल्या उपक्रमांचे आयोजन केल्याने बचत गटाच्या सर्व महिलांनी, ग्रामस्थांनी, शासकीय अधिकाऱ्यांनी कुंदा वैजनाथ ठाकूर, चैतन्य पाटील, विश्रांती घरत यांचे आभार मानले आहेत.