आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, मार्गशीर्ष पौर्णिमा दु. २ वा. ३२ मि. पर्यंत नंतर मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया, रविवार, दि. १५ डिसेंबर २०२४, चंद्र – वृषभ राशीत दु. ३ वा. ०४ मि. पर्यंत नंतर मिथुन राशीत, नक्षत्र – मृग, सुर्योदय- सकाळी ०७ वा. ०५ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ०३ मि.
नमस्कार आज चंद्र वृषभ राशीत दु. ३ वा. ०४ मि. पर्यंत रहात असून नंतर तो मिथुन राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चांगला दिवस आहे. आज रवि – चंद्र प्रतियोग होत आहे. आजचा दिवस सर्व राशींना संमिश्र जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : आपले आरोग्य उत्तम असणार आहे. महत्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपार पुर्वी करावीत. दुपारनंतर काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
वृषभ : काहींना दुपारनंतर अनपेक्षित धनलाभ संभवतो. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असल्याने कामे यशस्वी होणार आहेत. काहींना गुप्तवार्ता समजतील.
मिथुन : दुपारनंतर आपले मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.
कर्क : मानसिकता सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला एखादा मनस्ताप होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे आज नकोत. दुपारनंतर काही अनावश्यक खर्च संभवतात.
सिंह : दुपारनंतर अनपेक्षित गाठीभेटी पडतील. प्रियजनांशी झालेला सुसंवाद एखादा सुखद अनुभव देईल. काहींना विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामे होतील.
कन्या : नोकरी व व्यवसायातील महत्वाची कामे दुपारनंतर मार्गी लावता येणार आहेत. कामाचा ताण जाणवणार आहे. काहींना सार्वजनिक कार्यात मानसन्मान लाभेल.
तुला : दुपारनंतर आपणाला काही सुखकारक अनुभव येतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. काहींना दुपारनंतर अनपेक्षित प्रवास संभवतो. मनोबल उत्तम राहील.
वृश्चिक : दैनंदिन कामात दुपारनंतर अडचणी जाणवतील. मानसिक स्वास्थ्य कमी असणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी.
धनु : कामाचा ताण जाणवणार आहे. दुपारनंतर मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. कामाचा उरक वाढेल. वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडेल.
मकर : दुपारनंतर दैनंदिन कामाचा ताण जाणवणार आहे. मानसिक स्वास्थ्य कमी असणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. अनावश्यक कामात आपला वेळ वाया जाणार आहे.
कुंभ : दुपारनंतर उत्साह व उमेद वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहे. नोकरी, व्यवसायात कामे पूर्ण होणार आहेत. आर्थिक लाभ होतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल.
मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होणारेत. मानसिक त्रास कमी होईल. आनंदी वातावरण रहाणार आहे. काहींना एखादी भाग्यकारक अनुभव येणार आहेत. सार्वजनिक कामात तुमचा उत्साही सहभाग राहील.
आज रविवार, आज दु. ४.३० ते ६ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४