भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.
उरण दि १५(विठ्ठल ममताबादे) : हिंदू धर्मात गुरु या तत्वाला विशेष महत्व असून गुरुंचे प्रतीक असलेल्या व करोडो हींदुचे श्रद्धास्थान, आराध्य दैवत असलेल्या भगवान दत्तगुरु यांची जयंती महाराष्ट्रात सर्वत्र विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने,धार्मिक उपक्रमांनी साजरी केली जाते.उरणमध्येही दत्त जयंती निमित्त विविध ठिकाणी धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी उरण शहरातील देऊळवाडी मधील प्रसिद्ध दत्त मंदिर येथे देऊळवाडी युवक मंडळ व महेश बालदि मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
अन्न दान हे पवित्र दान आहे, अन्न दानाला सर्वात पवित्र व सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. उरण शहरा मधील देऊळवाडीतील प्रसिद्ध दत्त मंदिर येथे दरवर्षी महेश बालदी मित्र मंडळ व देऊळवाडी युवक मंडळातर्फे दत्त जयंती निमित्त अन्नदानाचे आयोजन करण्यात येते. देऊळवाडी युवक मंडळ व महेश बालदि मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि १४/१२/२०२४ रोजी सकाळी ११:३० ते दुपारी २ या वेळेत दत्त मंदिर देऊळवाडी येथे अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते.अन्नदान सोबत लाडूचेही वाटप करण्यात आले.यावेळी खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी महा प्रसादाचा लाभ घेतला. उरण शहरात दत्त जयंती निमित्त दरवर्षी खूप मोठी यात्रा भरत असते. दूरदूरचे लोक ,जनता भाविक भक्तगण देव दर्शनासाठी,यात्रेसाठी उरण मध्ये येत असतात. भाविक भक्त गण यांना चांगल्या सेवा मिळाव्यात म्हणून देऊळवाडी युवक मंडळाचे पदाधिकारी नेहमी झटत असतात. महेश बालदि मित्र मंडळ व देऊळवाडी युवक मंडळाच्या अन्नदाना सारख्या समाजोपयोगी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जेएनपीएचे विश्वस्त तथा आमदार महेश बालदि,भाजपा शहराध्यक्ष- कौशिक शहा, तालुकाध्यक्ष- रविशेठ भोईर,तालुका चिटनीस-प्रकाश ठाकुर, शहर युवा अध्यक्ष- नीलेश पाटिल उर्फ जय हरी,नगरसेवक-राजेश ठाकुर, धनंजय कडवे, नितिन पाटिल,रोहित पाटील, हितेश शहा,सविन म्हात्रे,मनोहर सहातिया हे सर्व भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते असून महेश बालदि मित्र मंडळाचे देखील ते पदाधिकारी-सदस्य आहेत. या सर्वांसह देऊळवाडी युवक मंडळाचे निरंजन नार्वेकर,श्री दत्त मंदिराचे पुजारी ओमकार सुनिल बैरागी,निशांत चव्हाण,विपुल झुजम,रंजन मुरुडकर,सतीश पुजारी, दत्ताराम पाटील,जतिन तवसाळकर, प्रवीण सुर्वे,गिरीश गुडेकर,प्रसाद म्हात्रे,पत्रकार विठ्ठल ममताबादे,तुषार म्हात्रे, आकाश जाधव, आशिष न्यायी,सुहास जुवेकर, कमळाकर घरत,साईनाथ ममताबादे आदि पदाधिकारी-सदस्य यावेळी उपस्थित होते.महेश बालदि मित्र मंडळ व देऊळवाडी मित्र मंडळाचे पदाधिकारी व भाविक भक्तांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे वाटप मोठ्या उत्साहात संपन्न झाले.