बुलडाणा, प्रतिनिधी:- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करणारा निषेधार्ह प्रकार परभणीत घडल्या नंतर आंबेडकरी जनतेच्या संतापाचा उद्रेक घडला.परभणीत आंबेडकरी जनतेने उत्स्फूर्त शांततेने आंदोलन करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत या निषेध आंदोलनाने तणावग्रस्त झाले.निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी परभणीत आंबेडकरी वस्त्यांमध्ये सुरू केलेले कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवावे अशी आपली मागणी बुलडाणा जिल्हा रिपाब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव, जिल्हध्याक्ष दक्षिण इंजिनियर शरद खरात, उत्तर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, महीलाजिल्हाध्यक्षा वंदनाताई वाघ, प्रा.मुक्तार पठाण यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे मार्फत निवेदनाव्दारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस व रिपाई राष्ट्रीयध्यक्ष तथा सामाजिकन्याय राज्यमंत्री भारत सरकार डॅा. रामदास आठवले यांचेकडे केली आहे.
परभणीत शांतता राखली जात आहे.मात्र पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन करून आंबेडकरी तरुणांना बेदम मारहाण करत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी तत्काळ कॉम्बिंग ऑपरेशन थांबवावे.काँबिंग ऑपरेशन त्वरित थांबवण्याची मागणी आहे . पुन्हा राज्यात अशी कोणतीही संविधान अवमनाची अप्रिय घटना घडू नये याची शासन प्रशासनाने खबरदारी घ्यावी व आरोपीवर योग्य कार्यवाही झाली नाही तर रिपाई आठवले गटा कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.या आंदोलनामुळे काही शासनाचे नुकसान झाल्यास त्या नुकसानीस शासन प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी आसा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला यावेळी जिल्ह्यातील रिपाईचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.