अतिश त्रिभुवन स्वभिमान समाजभुषण पुरस्काराने सन्मानित 

0

कोपरगाव प्रतिनिधी : येथील समता सैनिक दलाचे कमांडर अतिश त्रिभुवन यांना दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया द्वारे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्वभिमान समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ . भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते आज हरेगाव तालुका श्रीरामपूर येथे त्रिभुवन यांना हा पुरस्कार देण्यात आला. 

१६ डिसेंबर १९३९ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हरेगाव तालुका श्रीरामपूर येथे पहिले कामगार आणि दलित समाजासाठी स्वाभिमान धम्म परिषद घेतली होती . त्या स्मृती प्रीत्यर्थ दर वर्षी हरेगाव येथे दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि आंबेडकरी जनतेकडून अभिवादन करण्यात येते. तसेच समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस राज्यस्तरीय स्वभिमान समाजभुषण पुरस्कार दिला जातो . यावर्षीचा पुरस्कार समता सैनीक दलाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे डिविजन ऑफिसर तथा सहाय्यक शिक्षक अतिष त्रिभुवन यांना दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ . भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष यु जी बोराडे , अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुगतराव इंगळे , विजय कांबळे , सरचिटणीस अशोक बोरुडे, अण्णासाहेब झिने , महराष्ट्र राज्य संघटक ,नाशिक प्रभारी गौरव पवार,रमेश निकम ,गौतम पगारे , भाऊसाहेब घोसाळे,अशोक गायकवाड , विश्वास जमधडे, अरुणा पंडित,शोभा दाभाडे ,सुनिता भालेराव , अनिता कांबळे ,शैलजा जगताप इत्यादी महिला भागीनिंसह मोठ्यासंखेने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here