बुलडाणा (प्रतिनिधी)- मातृतिर्थ सिंदखेडराजा येथील डॅा.बाबासाहेब आंबेडकर बुध्द विहार समिती व आंबेडकरी उपासक उपासकानी मातृतिर्थ तालुक्यातील ग्राम ताडशिवणीचे फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे विचारधारेचे भूमीपूत्र मेहकर राखीव विधान सभेवर विजयी झाले आहे. त्यांचा बुध्द विहार समितीच्या वतीने व स्थानिक उपासक उपासिकेच्या वतीने ढोल ताशा गजरात फटाक्यांची आतिषबाजी पंचअर्ती,पुष्पमाला,पुष्प गुच्छ देवून भव्यदिव्य सत्कार केला व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सिंदखेडराजाचे भूमिपुत्र सेवानिवृत्त कॅाटन कार्पोरेशनचे एमडी व्हि.जी. जाधव (अंकल), सेवानिवृत अधिक्षक नारायण बी. म्हस्के, सेवानिवृत्त प्राचार्य व्ही.एन. म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक महेश जाधव, रिटायर मेजर व्दारकिनाथ म्हस्के, सेवानिवृत्त नायब तहसिलदार सुरेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बाबासाहेब जाधव, सेवानिवृत्त पोलिस सबइन्स्पेक्टर देविदास मांदळे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विमल जाधव, जयश्रीताई देविदास मांदळे, समाजसेवक तेजराव म्हस्के, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी गौतम जाधव, माजी सरपंच गौतम म्हस्के, शाहीर वसंतराव जाधव, प्रा. भगवान शिंदे डॅा. भिमराव म्हस्के, आदर्श शिक्षक प्रकाश म्हस्के, गौतम म्हस्के, कॅान्ट्राक्टर संदिप जाधव, कॅान्ट्राक्टर बोर्डे, बोधाचार्य विनायक काकडे, मगन जाधव, छगन काहाळे,बालू म्हस्के, मधूकर म्हस्के, देविदास जाधव, प्रकाश जाधव,जयाताई जाधव,लता जाधव, संगीता शिंदे, उषा कुंटे, राधा शिंदे, प्रतिभा शिंदे, संगीता सुतार, लक्ष्मी शिंदे, कमल शिंदे, बेबीताई वाघमारे, योगाचा जाधव, रंजना म्हस्के,सुनिता वाघमारे इत्यादी असंख्य उपासक, उपासिका हजर होते.