राहुरीत अल्पवयीनशाळकरी मुलीचा विनयभंग करून अपहरणाचा प्रयत्न

0

देवळाली प्रवरा / प्रतिनीधी,

       शाळा सुटल्यावर घरी जात असलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग करून तीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सदर मुलीने आरडा ओरड करुन तेथून पळ काढला. ही घटना राहुरी तालुक्यातील जांभळी येथे दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. 

          राहुरी तालुक्यातील जांभळी येथे दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान एक अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी जात होती. त्यावेळी वावरथ येथील रहिवासी असलेला अनिकेत संजय बाचकर या तरुणाने सदर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत अपहरण करण्याची घटना समोर आली.

आरोपी तरुणाने त्या अल्पवयीन मुलीस मोटारसायकल आडवी लावली व त्या तरुणीचा हात धरून तु मला आवडते. माझ्या गाडीवर बस म्हणत गाडीवर बसवून त्या मुलीचा विनयभंग करत अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणीने प्रसंगावधान दाखवत त्याचा हात हिसकावत मोठ्या मोठ्याने ओरडा ओरडा करत आपल्या घराच्या वस्तीकडे पळ काढला. त्या ओढातानीत मुलगी खाली पडल्याने तीच्या हाताला मार लागला. ते पाहून त्या तरुणाने तेथून धूम ठोकली. त्या मुलीने रडत रडत घर गाठले असता तिच्या आई वडिलांनी तुला रडायला काय झाले, याबाबत विचारले. तिने आपल्या आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. 

       

सदरच्या प्रकाराने ती अल्पवयीन मुलगी घाबरुन गेल्याने तिच्या आई वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी अनिकेत संजय बाचकर या तरुणा विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर आरीपी पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक समाधान फडोळ हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here