मुंबई : जगभरात मागणी असलेला आफ्रिकेतील मलावीमधील केंट प्रजातीचा आंबा भारतीय बाजारात प्रथमच दाखल झालाय. पुढील २० दिवस हा आंबा मार्केटमध्ये उपलब्ध असणार आहे.
आफ्रिकेतून आयात करण्यात आलेल्या आंब्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या आंब्याला जगभरात मागणी असते. पुढील काही दिवस आंबा खवय्यांना याची चव चाखता येणार आहे. या आंब्याचे दर ७०० किलो रुपयांचा भाव आहे.
एपीएमसीतील फळबाजारात २७० बॉक्स आंब्यांची आयात झालीय. ऐन थंडीत आंब्याची चव चाखता येणार आहे. मुंबईसह गुजरात आणि दक्षिण भारतात या आंब्याला मोठी मागणी आहे.हा आंबा आकाराने आणि वजनाने ४०० ग्रॅम वजनाचा असतो. मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिकिलो ७०० किलो रुपये दराने आंब्याची विक्री होत आहे. दक्षिण पूर्व आफ्रिकेतील हापूस सदृष्य व टाॅमी अटकीन हे आंबे मागील काही वर्षांपासून नोव्हेंबरमध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत असतात.