प्रतापगङ प्रतिनिधी :
सालाबाद प्रमाणे बिरमणी ता.महाबळेश्वर येथील ग्रामदैवत भैरीजोगेश्वरीचा वार्षिक यात्रौत्सव रविवार दि.१२ व सोमवार दि.१३ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.
दि.१२ रोजी युवकांसाठी मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने होणार असुन यासाठी आकर्षक पारितोषिके प्रायोजित करण्यात आली आहेत.दि.१२ रोजी दुपारी महिलांसाठी हळदीकुंकू,सायंकाळी प्रासादिक भजन सेवा,रात्री परिसरातील विविध देवदेवतांच्या दिंङींचे आगमन होणार असून रात्री ९ ते ११ महाप्रसाद त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व बक्षिस वितरण समारंभ झाल्यानंतर यात्रेतील ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा बघाङ कार्यक्रम संपन्न होणार आहे.रात्री मनोरंजनात्मक लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि.१३ रोजी पहाटे काकङ आरती होणार असुन सकाळी ६ वाजता गावातुन श्रींचा छबिना व पालखी मिरवणूक होणार आहे. सकाळी ११ पासुन महाप्रसादाचे आयोजन असुन त्यानंतर लोकनाट्य तमाशा कलावंत आपली कला सादर करणार आहेत.दुपारी ३.३० वाजता दिंङी समारोपाने यात्रौत्सवाची सांगता होणार आहे.
कोयना पंचक्रोशीतील या ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेल्या यात्रौत्सवात सर्वांनी सहभागी होऊन देव देवतांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन भैरीजोगेश्वरी देवस्थान व बिरमणी ग्रामस्थांनी केले आहे.