कारखाना व्यवस्थापनाशी ऊस दर आणि सभासद शेतकरी प्रश्नावर चर्चा
बारामती: सोमेश्वर नगर येथे आजच्या बैठकीला कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकरी सभासद प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी अध्यक्ष व संचालकांसोबत समन्वय साधून पुढील पंधरा दिवसात बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी पत्राद्वारे खाजदारांनी अध्यक्षांना केली. तसेच बैठकीसाठी वेळ दिल्याबद्दल व्यवस्थापकीय संचालकांचे आभार मानले.
याप्रसंगी खाजदार सुप्रिया ताई सुळे तसेच युगेंद्र पवार, एस एन बापू जगताप , राजेंद्रबापू जगताप, वनिता बनकर, प्रियांका शेंडकर, प्रदीप शेंडकर, पैगंबर शेख, सागर मदने, राजेंद्र लकडे, प्रवीण भोसले, चारुहास शिंदे, केतन भोसले ,राजेंद्र गायकवाड, विनोद गायकवाड, सोनाली गायकवाड, संभाजी होळकर, संग्राम होळकर, किरण गायकवाड, हर्षद होळकर, बाबासो होळकर, पृथ्वी चव्हाण, शशी काकडे, शंभु काकडे, अमर पठाण, आपसाना मुलानी, सोमनाथ सावंत, स्वाती काकडे, सतिष काकडे, निवृती शेंडकर आदी उपस्थित होते.