सातारा : समाजाचे आपण देणं लागतो.या न्यायाने नियमितपणे कार्य करणारे समाजाचे खरे-खुरे सन्मानाचे हक्कदार असतात. असे प्रतिपादन प्रभाकर बनसोडे यांनी केले. धगधगती मुंबई वृत्तपत्र तसेच सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या विद्यमाने बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांचा सन्मान करण्यात आला होता. तेव्हा सर्वत्र अभिनंदनपर गौरव होत आहे.म्हणूनच प्रभाकर बनसोडे यांनी नियोजनपूर्वक पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला.
यावेळी ऍड.हौसेराव धुमाळ अशोक नागटिळक,जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस दिलीप फणसे, ग्रामपंचायत सदस्या भारती मोरे,दिलीप सावंत, प्रभाकर बनसोडे,यशपाल बनसोडे,शाहिर श्रीरंग रणदिवे, सुनील मोरे, दिलीप कांबळे,संतोष मोरे यांनी आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास उपसरपंच सुमन चोरगे,ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते, शंकर रणबागले, ऍड.विलास वहागावकर,सतीश गायकवाड, महेंद्र महादेव मोरे,महावीर गायकवाड,आप्पा मोरे,मिलिंद मोरे,महादेव मोरे,तुकाराम गायकवाड,शाहिर किरण जगताप, संतोष मोरे, सत्यवान गायकवाड आदी विविध क्षेत्रातील मान्यवर-कार्यकर्ते उपस्थित होते.