गोंदवले – सातारा जिल्हा माण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंदवले खुर्द या ठिकाणी बाल बाजाराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना व्यवहारीक गणित ज्ञानाचा अभ्यास व्हावा.त्यांना एक प्रकारचा आनंद मिळावा.म्हणून याचे आयोजन करण्यात आले होते. या बालबाजाराला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.या बालबाजारात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. लोकांनी त्या अगदी आवडीने खरेदी केल्या.त्यामुळे तेथील बाल विक्रेते अगदी आनंदून गेले.त्यांना आगळावेगळा असा अनुभव आला.
या बाल बाजाराच्या निमित्ताने गावातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.यामध्ये प्रामुख्याने गोंदवले खुर्दचे उपसरपंच अमोल पोळ,विकास सेवा सोसायटीचे सदस्य अर्जुन शेडगे,ग्रामपंचायत सदस्य विजय अवघडे,अक्षय चव्हाण व गणेश गुरव आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच गोंदवले खुर्द प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका इंद्रायणी जवळ,सहकारी शिक्षक बाबा खाडे,सुवर्णा काळे यांनी या बालबाजार उपक्रमात सक्रियपणे सहभाग घेतला होता.