उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )
नवघर ग्रामपंचायतच्या वतीने १५ वा वित्त आयोग मधून आरोग्य उपकेंद्र नवघरला २ कपाटे, २ टेबल, १० खुर्च्या, २ ऑफिस खुर्च्या, घड्याळ, वजन काटा, उंची मोजणी टेप व इतर मेडिकल साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच सविता मढवी, उपसरपंच संध्या पाटील, सदस्य रंजना भोईर, रत्नाकर चोगले, रवि पाटील, नितीन मढवी, विस्तार अधिकारी विनोद मिंढे, ग्रामविकास अधिकारी गुरुप्रसाद म्हात्रे, कोप्रोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कविता भगत, सीएचओ पुष्पा पाटील, आरोग्य सेवक निलेश झावरे, आशाताई – सीमा बंडा, अपर्णा बंडा, अरुणा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.