इलाबेन मेहता विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये ‘मातृ-पितृ वंदना’ सोहळा संपन्न

0

प्रतापगङ प्रतिनिधी

आई बाबा माझी काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा असे सांगत विद्यार्थी आपल्या पालकांच्या चरणी नतमस्तक झाली . महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथील इलाबेन मेहता विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये ‘मातृ-पितृ वंदना’ कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या आई-वडिलांच्या चरणी पूजा करून आई-वडिलांची नतमस्तक होऊन माफी देखील मागितली . आयुष्यात कधीही सुख करणार नाही. तुमची मान खाली घालून देणार नाही. असा प्रण केला व आई-वडिलांची पूजा केली.

  पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम शाळेने घेतला होता मुलगा आई-वडील यांचे संवाद व महत्व वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता . हल्ली मोबाईलच्या दुनियेत मुलांवर संस्कार कसे करायचे व त्यांना आई-वडिलांशी कसे वागावे हे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here