भुईंज : सातारा जिल्यातील भुईंज येथे सोमवार, दि. 20 जानेवारीला सातारा जिल्हा खुला पुरुष गट जिल्हा निवड चाचणी अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत आहे.सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन व भुईंज नगरपंचायतीचे उपसरपंच शुभम पवार यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
भुईंज नगरपंचायतीचे उपसरपंच शुभम मनोज पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी आपले प्रवेश अर्ज दि. 19 जानेवारीपर्यंत सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सातारा येथील कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे.
दि. 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता पुरुष गट स्पर्धा होणार आहे.स्पर्धेसाठी खेळाडूचे वजन 85 किलोच्या आत असणे आवश्यक आहे. स्पर्धकाने आधारकार्डची रंगीत प्रत सोबत आणणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघांनी ह्या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आवाहन सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव प्रणव लेवे यांनी केले आहे.