सातारा : ज्येष्ट पत्रकार शरद महाजनी (आण्णा) यांनी आदेश खताळ व पद्माकर सोळवंडे यांना पुरस्कार देऊन नव्या पिढीतील पत्रकारांना बळ दिले आहे.म्हणून पत्रकार अनिल वीर व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.शिवाय,पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यातआल्या.
ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दोघांना आदर्श पत्रकार पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हा यंदा पहिल्या वर्षी आदेश खताळ व पद्माकर सोळवंडे यांना मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात आला.तेव्हा पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण,शहराध्यक्ष विठ्ठल हेंद्रे,अमित वाघमारे,मीना शिंदे, सागर गुजर,रिजवान सय्यद, श्रीरंग काटेकर,प्राचार्य विजय राजे,जावेद खान,ऍड.विलास वहागावकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरासह पत्रकार उपस्थीत होते.