मानवाने मानावासारखा व्यवहार करावा : भोसले

0

सातारा : मानवी जीवन हे धम्मानुसार आत्मसात करावे. धम्माचरण कृतिशील असले तरच माणूस म्हणून मानवासारखा व्यवहार करता येईल.असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षक भागवत भोसले यांनी केले. कालकथीत शांताबाई एकनाथ फणसे यांचा २४ वा स्मृति दिन  शिवशक्ती हौसिंग सोसायटी कोडोली,ता.सातारा येथे संपन्न झाला.तेव्हा भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक भागवत भोसले मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले,”धम्माची परंपरा फणसे गुरुजींच्या परिवाराने चालवली आहे. सर्वांगीण सुंदर सुसंस्कारिक समाज हा धम्म विचाराने निर्माण होत असतो.संस्कारापासून विज्ञान निर्माण झाले आहे. मानवात सदगुण असले पाहिजे.”

   

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष काशिनाथ गाडे (जावली) तालुकाध्यक्ष विजय सातपुते(वाई), माजी तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने (सातारा), बौद्धाचार्य कुमार सुर्वे आदींनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केले.सदरच्या कार्यक्रमात शाहिर किरण जगताप, ढोलकीपटू दिलीप कांबळे यांच्या संचलनातून भीमबुद्ध गीतांचाही कार्यक्रम संपन्न झाला.त्यांना महादेव मोरे,संतोष मोरे व तुकाराम गायकवाड यांनी साथ दिली.

कालकथित शांताबाई फणसे व महापुरुष यांच्या प्रतिमांना फणसे-कीर्तने कुटुंबाने पुष्पहार अर्पण करून अगरबत्ती-मेणबत्ती प्रज्वलन अनिल वीर आणि मान्यवरांनी केले.संपूर्ण विधी भागवत भोसले यांनी वामन गायकवाड यांच्या सहाय्याने पार पाडला.सदरच्या कार्यक्रमास जिल्हा भारतीय बौद्ध महासंघाचे नंदकुमार काळे, प्रकाश तासगावकर,दिलीप सावंत, सत्वशीला कीर्तने, शोभा दिलीप फणसे,दिनेश माने (वडूथ),योगेश मस्के,समाधान कांबळे, मनोज वाघमारे,किरण कांबळे आदी पदाधिकारी, जिल्ह्यातील कार्यकर्ते,उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here