देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
डॉ.तनपुरे कारखाना संचलित विवेकानंद नर्सिंग होमचे प्राचार्य अनंतकुमार शेकोकार व परचेस अधिकारी सिद्धेश्वर सूर्यवंशी यांनी नर्सिंग होममधील कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देऊन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याने तब्बल १० कर्मचाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला व आ.शिवाजी कर्डिले यांना निवेदन पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदनात कर्मचाऱ्यांनी म्हंटले की, श्री. विवेकानंद नर्सिंग होम या संस्थेत अनेक वर्षांपासुन काम करीत आहोत. आमच्या आणि सिध्देश्वर भाऊसाहेब सुर्यवंशी त्यांचा कुठलाही वाद नसुन विनाकारण आम्हाला मानसिक त्रास देत आहे. १३ जानेवारी आर्युवेद महाविद्यालय प्राचार्य डॉ. शेकोकर यांनी आम्हांला त्यांच्या कार्यालयात बोलावुन सांगितले की, सिध्देश्वर भाऊसाहेब सुर्यवंशी यांनी तुमच्या विरोधात तक्रार केली आहे.सूर्यवंशी व डॉ. शेकोकर यांनी संगमताने आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला असे आमच्या निर्देशनास आले. महाविद्यालयीन प्राचार्य डॉ. शेकोकर साहेब यांनी सूर्यवंशी स्वतः त्यांच्या हातावर व शररीरावर टोकदार व धारदार शस्त्राने जमखा केल्या तरी सर्व आरोप तुमच्यावर येईल असे सांगुन सुर्यवंशी व प्राचार्य या दोघांने संगमताने आम्हाला विनाकारण मानसिक त्रास देत आहे.
आमच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे नाही. आम्ही सर्व सामान्य नागरीक आहोत. या व्यक्तीचे त्रासामुळे या आगोदर काही अधिका-यांना राजीनामा देण्याची वेळ आलेली आहे. अशाच प्रकारचे इतरांना व आम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न चालु असुन त्या करीता ही व्यक्ती कोणत्याही स्थराला जावुन खोट्या नाट्या केसेस करण्याचा प्रयत्न करीत आहे. सदर व्यक्तीची गुन्हेगारी तसेच गटकळ करण्याची मानसिकता आहे. सदर व्यक्तीकडुन आमच्या कुटुंबातील व्यक्तींची शाररीक हानी झाल्यास किंवा आम्हाला काही झाल्यास तसेच आमच्या नोकरीला बाधा आल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार सिध्देश्वर भाऊसाहेब सुर्यवंशी व त्याला पाठीशी घालणारे डॉ. शेकोकर यांची राहील असे निवेदनात म्हंटले आहे.
या निवेदनावर सुदाम भागवत, योगेश जाधव, राजेंद्र साळुंके, राजेंद्र लांबे, अशोक उगले, प्रमोद साळुंके, डॉ.बाळासाहेब पागिरे, गोविंद पठारे आदींच्या सह्या आहेत.