हडपसर प्रतिनिधी :
रयत शिक्षण संस्था, कर्मवीर विद्याप्रबोधिनी यांच्या मार्फत पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धा-२०२५ चे आयोजन एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे शुक्रवार दि.१७ व १८ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले होते. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक एस. जी. एम. कॉलेज, कराड, द्वितीय पारितोषिक बळवंत कॉलेज, विटा, तृतीय पारितोषिक इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज, सातारा यांना तर उत्तेजनार्थ पारितोषिक सी.डी. जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर व महात्मा फुले कॉलेज, पिंपरी यांनी मिळविले.
प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सचिव, विकास देशमुख (IAS Retd.) आणि कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे कार्यकारी संचालक प्रिं.डॉ. विजयसिंह सावंत होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन आमदार चेतन (दादा) तुपे पाटील, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप (आबा) तुपे पाटील, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अमर तुपे व रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (उच्च शिक्षण) प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विकास देशमुख (IAS Retd.) म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेच्या वतीने गेली १८ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. अशा प्रकारच्या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भावी प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. असे मत व्यक्त केले. तर कर्मवीर विद्याप्रबोधीनीचे कार्यकारी संचालक प्रिं.डॉ. विजयसिंह सावंत म्हणाले की, प्रश्नमंजुषा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळू शकतो. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे करिअर म्हणून पहावे. असे मत प्रिं.डॉ. विजयसिंह सावंत यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धा-२०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संयोजन डॉ.शहाजी करांडे, डॉ.अतुल चौरे, प्रा.ऋषिकेश खोडदे व प्रा.अजित भोसले यांनी केले. स्पर्धेसाठी ज्युरी म्हणून उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे, उपप्राचार्य प्रा.संजय जडे, प्रो . डॉ.दिनकर मुरकुटे यांनी काम पाहिले. तर गुणलेखनाचे
काम प्रो. डॉ. रंजना जाधव, प्रा. अस्मिता झोटिंग व प्रा.सागर दरेकर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अतुल चौरे, पाहुण्यांची ओळख डॉ.शहाजी करांडे तर आभार उपप्राचार्य डॉ.संजय जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नम्रता कदम, प्रा.नयना शिंदे यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.