येवला प्रतिनिधी : दि.१९ :येवला तालुका जि. प. अध्यक्ष चषक स्पर्धा डी पॉल इंग्लिश मीडियम स्कुल येवला येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.स्पर्धेत तालुक्यातील सहा बीटातील विजेत्या स्पर्धकांनी कला,क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत भाग घेतला त्यात आदर्श शाळा अंगुलगाव शाळेने आठ प्रकारात सहभाग घेतला होता त्यापैकी सहा प्रकारात घवघवीत यश मिळविले प्रथम क्रमांकाचे 3 व्दितीय क्रमांकाचे 1 व तृतीय 2 पारितोषिक मिळविले आहे.
कबड्डी मुलांचा संघ सलग चार वेळा जिल्हास्तरावर येवला तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्पर्धेचा निकाल-प्रथम क्रमांक कब्बडी मुले वैयक्तिक गीतगायन लहान गट-साई पारखे वैयक्तीक गीतगायन मोठा गट- साईराज साळे द्वितीय क्रमांक-चित्रकला मोठा गट-आशिष वाघ तृतीय क्रमांक-वक्तृत्व मोठा गट-वैष्णवी कांबळे
स्पेलिंग बी मोठा गट-नोवेल कुबेरजी स्पर्धेतील स्पर्धकांना मुख्याध्यापक विजयसिंग शिंदे,गोपीनाथ पवार,विजय परदेशी,गणेश दसपुते,अशोक दाणे,दिलीप गोरणे,कामिनी पाटील,मोनिका बस्ते, ज्ञानेश्वर जगझाप,दत्तात्रय भड, आंनदा वाघ यांनी मार्गदर्शन केले तर सहभागी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी- संजय कुसाळकर, विस्तार अधिकारी-मनीषा वाघचौरे,केंद्रप्रमुख-अरुण खरोटे,माजी सभापती-प्रविण गायकवाड,सरपंच-बाजीराव जाधव, शा. व्य. समिती अध्यक्ष-दीपाली घळगे,पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.