संजय राऊतांचे गुरु शरद पवारांचा इतिहास खंजिराचाच – चंद्रकांत पाटील

0

पुणे : संजय राऊत ज्यांना गुरू मानतात, त्या शरद पवारांचा इतिहास खंजिराचाच आहे, अशी टीका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी वरील वक्तव्य केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला काल (16 नोव्हेंबर) त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली होती. या भेटीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकाही केली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला हात जोडायला जात असाल, तर हातातील खंजीर बाजूला ठेवा, असं राऊत यांनी म्हटलं होतं. याच टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “संजय राऊत ज्यांना गुरू मानतात, त्या शरद पवारांचा इतिहास खंजिराचाच आहे. शिंदे गटाच्या खंजिराला एक पार्श्वभूमी आहे. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा विसर पडल्यामुळे आणि ते असह्य झाल्यामुळे शिंदेंनी शिवसेना सोडली. पण त्यांचा हा आपसातला विषय आहे.” 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here