शारिरीक शिक्षण धोरण असशक्त का ? : शासनास केला सवाल
येवला (प्रतिनिधी )
शारिरीक शिक्षण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून त्या-त्या शाळेच्या विद्यार्थी पटसंख्येनुसार नव्या पद्धतीने क्रीडा शिक्षक पद भरती करावी ह्या मागणीचे निवेदन येवला तहसील कार्यालयाच्या निवासी नायब तहसीलदार श्रीमती पंकज मगर यांनी अध्यापकभारती च्या वतीने देण्यात आले.
शारिरीक शिक्षण शिक्षक अर्थात क्रीडा शिक्षक नियुक्ती सूत्र सन २००५ चा शाशन निर्णय २५० विद्यार्थी पटसंख्या मागे एक क्रीडा शिक्षक पद मान्यता ह्या नियमात बदल करून तो आता नव्याने शंभर ते दीडशे विद्यार्थी पटसंख्या मागे एक क्रीडा शिक्षक पद मान्यता असा करून तात्काळ क्रीडा शिक्षक पदे भरण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र शासनास राष्ट्रीय बालक:विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारती च्या करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना अधिक मानसिक, सुदृढ,सशक्त करणे आवश्यक आहे.अशक्त शारिरीक शिक्षण धोरण सशक्त करून शाळा-महाविद्यालयात क्रीडा शिक्षक कर्मचारी नियुक्ती करून शाळा,महाविद्यालयात क्रीडासाहित्य तात्काळ पुरवावे अशी मागणी आज शारिरीक शिक्षण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात कला,क्रीडा विद्यापीठ स्थापन व्हावे,कला,क्रीडा,संगणक, कार्यानुभव विषय शिक्षक तात्काळ नियुक्त करण्यात यावे अशी मागणी अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ, तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ उंडे सर,भारतीय अकॅडमी येवलाचे संचालक राजरत्न वाहुळ यांनी मागणी केली असून गायत्री खोकले ,सायली दिघे ,प्रवीण गायकवाड ,नंदकिशोर सोमासे ,तन्मय पगारे ,अमोल राजगुरू
यांच्या निवेदनाद्वारे सह्या आहे.